नगर महापालिका अस्तित्त्वात नसलेल्या जागेवर 15 वर्षे आकारत होती घरपट्टी

अहमदनगर महापालिकेचा ( Ahmednagar Municipal Corporation ) विचित्र कारभार नुकताच समोर आला आहे.
नगर महापालिका अस्तित्त्वात नसलेल्या जागेवर 15 वर्षे आकारत होती घरपट्टी
AMCSarkarnama

अहमदनगर - काही वर्षांपूर्वी जाऊ तिथे खाऊ हा मराठी चित्रपट प्रसिद्ध झाला होता. यात विहीर हरविल्याचा प्रसंग दाखविला आहे. असाच काहीसा प्रकार अहमदनगर शहरात घडला आहे. अहमदनगर महापालिकेचा विचित्र कारभार नुकताच समोर आला आहे. अस्तित्त्वात नसलेल्या जागेवर अहमदनगर महापालिका मागील 15 वर्षांपासून घरपट्टी देत होती. अखेर या चुकीची महापालिकेला लिखित कबुली देत माफी संबंधिताची लेखी माफी मागावी लागली. ( Ahmednagar Municipal Corporation was levying lease on the non-existent land for 15 years )

अहमदनगर शहरातील तोफखाना भागात गणेश (विनायक) ठाकूर नावाचे व्यक्ती राहतात. त्यांच्या बाबतीत हा अजब प्रकार घडला आहे. ठाकूर कुटुंबाचे तोफखाना भागात तीन वाडे होते. त्यातील एका वाड्याच्या जागेत गणेश ठाकूर यांनी अपार्टमेंट बांधले. अपार्टमेंट व उर्वरित वाड्याची घरपट्टी वेगळी करण्यासंदर्भातील अर्ज ठाकूर यांनी महापालिकेकडे केला होता. घरपट्टी वेगळी करताना महापालिकेकडून गंभीर चूक झाली. त्यामुळे हा प्रकार घडल्याचे ठाकूर सांगतात.

AMC
नगर महापालिकेच्या कचराडेपोला बुरूडगावकरांनी ठोकले टाळे

गणेश ठाकूर यांनी सांगितले की, अस्तित्त्वात नसलेल्या जागेवर महापालिकेने मागील 15 वर्षांपासून घरपट्टी आकारणी करत होती. त्यामुळे मी घरपट्टी भरत नव्हतो. मी घरपट्टी भरत नसल्याने महापालिकेने या संदर्भात ठाकूर यांच्या विरोधात जिल्हा न्यायालयात दावा दाखल केला मात्र दावा पुढे चालविला नाही. मी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना वेळोवेळी घरपट्टी चुकीची असल्याबाबत कल्पना देऊनही घरपट्टी आकारणी सुरूच होती. शेवटी घरपट्टी 5 लाख 79 हजार 772 रुपयांपर्यंत गेली. त्याची नोटीस महापालिकेने माझ्या घराच्या प्रवेशद्वारावर चिकटवली.

AMC
शिवाजी कर्डिले म्हणाले, राम शिंदेंना विधान परिषदेचे आमदार करा...

त्यांनी पुढे सांगितले की, मी महापालिकेला दोन अर्ज दिले की, माझी जागा अस्तित्त्वात नसताना त्याची घरपट्टी देण्यात येत आहे. जागा निर्लेखित करून मिळावी, असा अर्ज केला. त्यानुसार महापालिकेच्या स्थायी समितीने 11 जानेवारी 2022 ला ठराव करून ही घरपट्टी निर्लेखित केली. 31 मार्च 2022ला मी महापालिका आयुक्त शंकर गोरे यांना पत्र लिहिले की, जी जागाच अस्तित्त्वात नाही त्याची महापालिका मागील 15 वर्षे घरपट्टीची मागणी करते. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करावी व महापालिकेने लिखीत माफी मागावी. अन्यथा महापालिकेवर मानहानीचा दावा दाखल का करू नये, असे सांगितल्यावर महापालिकेने गुरुवारी ( ता. 21 ) माझी लिखीत माफी मागितली असल्याचे ठाकूर यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.