Nagar Politics : रोहित पवारांकडे विजयाचे पारडे फिरवणारा बडा नेता भाजपच्या गळाला

Nagar Politics : कर्जत-जामखेड मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
Nagar Politics, Praveen Ghule, Ram Shinde
Nagar Politics, Praveen Ghule, Ram Shinde Sarkarnama

Nagar Politics : अहमदनगरमध्ये मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. अहमदनगरचे काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण घुले (Praveen Ghule) हे भाजपच्या वाटेवर आहेत. घुले यांनी दोनच दिवसांपूर्वी भाजप आमदार राम शिंदे (Ram Shinde) यांची भेट घेतली होती. यावेळी दोघांमध्ये जवळपास दोन तास बंद दाराआड चर्चा झाली होती.

कर्जत-जामखेड मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. राष्ट्रवादी आणि इतरही पक्षातील नेत्यांना भाजपमध्ये खेचण्यासाठी पक्षाच्या वतीने जोरदार प्रयत्न करण्यात येत आहेत. काही दिवसांपूर्वीच जामखेड तालुक्यातील राजुरी, बांगरवस्ती, डोळेवाडी आणि खर्डा परिसरातील 200 कार्यकर्त्यांनी शिंदे यांच्या निवासस्थानी भाजपमध्ये प्रवेश केला होता.

Nagar Politics, Praveen Ghule, Ram Shinde
अजितदादा शिंदे गटाचे उमेदवार झालेल्या संजय पवार यांचे काय करतील?

त्यानंतर आता काँग्रेसचे (Congress) जिल्हा उपाध्यक्ष घुले हेही लवकरच काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे हा रोहित पवार आणि काँग्रेससाठी धक्का असल्याचे सांगितले जात आहे. घुले हे कर्जतमधील काँग्रेस पक्षाचे नेते आहेत. रोहित पवार यांना त्यांनी चांगली साथ दिली. मात्र, आता त्यांनी भूमिका बदलल्याचे दिसत आहे. राम शिंदे यांची विधान परिषदेवर झालेली निवड आणि त्यानंतर राज्यात झालेले सत्तापरिवर्तन यामुळे या प्रक्रियेला वेग आला आहे.

सोमवारी रात्री कर्जतमधील गोदड महाराज मंदिरात त्यांनी कार्यकर्त्यांची बैठक घेतली होती. मतदारसंघाच्या विकासासाठी सत्तेसोबत राहणे आवश्यक असल्याने निर्णय घेण्याची वेळ आली आहे, असे घुले यांनी कार्यकर्त्यांना यावेळी सांगितले. रोहित पवार आणि काँग्रेसच्या कार्यपद्धतीवर घुले यांची नाराजी असल्याची चर्चा आहे.

Nagar Politics, Praveen Ghule, Ram Shinde
मोठी बातमी ! शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र येणार: ठाकरे- आंबेडकरांची युतीची घोषणा

आपल्याला कर्जत नगरपंचायत निवडणूक स्वतंत्र लढवण्याची इच्छा होती. मात्र, पक्षाने ते मान्य केले नाही, त्यामुळे त्यांची नाराजी असल्याचे सांगितले जात आहे. कर्जत आणि जामखेड तालुक्यात घुले यांचा चांगला संपर्क आहे. त्यामुळे येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी घुले हे भाजपचे भावी उमेदवार असणार का याचीही चर्चा मतदार संघात होत आहे. त्यांचा भाजप प्रवेश हा रोहित पवार यांच्यासाठी धक्का मानला जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com