Solapur University : अहिल्यादेवी स्मारक समिती सरकारने बदलली; भाजप-शिंदे समर्थकांना संधी

माजी आमदार नारायण पाटील यांच्यासह भाजप व शिंदे गटाच्या सर्वाधिक समर्थकांचा त्या समितीमध्ये भरणा असल्याचे दिसून येते.
Solapur News
Solapur NewsSarkarnama

Solapur News : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात अहिल्यादेवींचे भव्य स्मारक (Ahilya Devi Memorial) होत आहे, त्यासाठी मोठा निधी देखील देण्यात आला आहे.

पण, महाविकास आघाडी सरकारने नेमलेली स्मारक समिती (Committee) आता शिंदे (Eknath Shinde)-फडणवीस (Devendra Fadnavis) सरकारने रद्द केली आहे. त्याठिकाणी नवीन सदस्यांना संधी देण्यात आली आहे.

माजी आमदार नारायण पाटील (Narayan Aba Patil) यांच्यासह भाजप व शिंदे गटाच्या सर्वाधिक समर्थकांचा त्या समितीमध्ये भरणा असल्याचे दिसून येते. (Ahilya Devi Memorial Committee in Solapur University changed by Govt : opportunity for BJP-Shinde supporters)

सद्यस्थितीत विद्यापीठाच्या कोंडी (ता. उत्तर सोलापूर) या परिसरात मुख्य प्रशासकीय इमारत व परीक्षा भवन इमारतीचे बांधकाम सुरु आहे. या इमारतीसमोर पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे मोठे स्मारक उभारले जात आहे.

स्मारक उभारणी करण्यासंदर्भात लोकप्रनिधींकडून तसेच जिल्ह्यातील स्थानिक सामाजिक संघटना आणि विविध घटकांकडून विद्यापीठाकडे मागणी होत होती.

त्यामुळे सोलापूर विद्यापीठाच्या परिसरात विद्यापीठ व सरकारच्या संयुक्त सहभागाने अहिल्यादेवींच्या स्मारकासाठी २३ ऑगस्ट २०२१ रोजी स्मारक समिती नेमण्याचा निर्णय झाला.

Solapur News
CM On Koshyari : मुख्यमंत्री म्हणाले, ‘महाराष्ट्राला कोश्यारींची ओळख ‘या’ कारणांमुळे कायम राहील’
Ahilya Devi Memorial Committee Membar
Ahilya Devi Memorial Committee MembarSarkarnama

नवीन स्मारक समितीत यांचा समावेश

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली १७ जणांची स्मारक समिती असणार आहे. कुलगुरु या समितीच्या कार्याध्यक्षा, तर कुलसचिव समन्वयक असतील.

सदस्यांमध्ये माजी आमदार नारायण पाटील, बापू हटकर, शिवाजी बंडगर, डॉ. बाबासाहेब देशमुख, मोहन हळणकर, शिवदास बिडगर, शिवाजी कांबळे, सुभाष मस्के, समता गावडे-सोनटक्के, नागेश वाघमोडे, अमोघसिद्ध ऊर्फ अमोल कारंडे, शरणू हांडे, बापू मेटकरी, सोमेश क्षीरसागर यांचा समावेश करण्यात आला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com