बारामतीतील आजोबा, नातवाला भविष्यातील राजकारणासाठी अहिल्यादेवींचा साक्षात्कार झालाय

भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर ( Gopichand Padalkar ) हे अहमदनगर जिल्हा दौऱ्यावर आहेत.
Gopichand Padalkar, Monika Rajale BJP
Gopichand Padalkar, Monika Rajale BJPSachin Satpute

शेवगाव ( जि. अहमदनगर ) - पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकर यांची जयंती अवघ्या दोन दिवसांवर आली आहे. यातच भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर ( Gopichand Padalkar ) हे अहमदनगर जिल्हा दौऱ्यावर आहेत. शेवगाव शहरातील धनगरगल्ली येथे पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकर तरुण मंडळ व सकल धनगर समाज यांच्या संयुक्त विदयमाने बसवण्यात आलेल्या राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याचे अनावरण व नगरसेवक सागर फडके यांच्या प्रयत्नातून पूर्ण झालेल्या सभामंडपाचे लोकार्पण आमदार पडळकर यांच्या हस्ते काल (शनिवारी) झाले. ( Ahilya Devi has been interviewed for future politics by her grandfather and grandson from Baramati )

Gopichand Padalkar, Monika Rajale BJP
सुजय विखे, पडळकर, राम सातपुते भाजपची तगडी टीम मैदानात उतरणार

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार पडळकर होतो. यावेळी आमदार मोनिका राजळे, राम महाराज झिंजुर्के, भाजपचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंढे, नगरसेवक सागर फडके, महेश फलके, बापुसाहेब भोसले, भाजपचे तालुकाध्यक्ष तारांचद लोढे, माणिक खेडकर, बापुसाहेब पाटेकर, दिनेश लव्हाट, अशोक आहुजा, राहुल बंब, भाऊसाहेब कोल्हे, गणेश कोरडे, भाजपच्या महिला तालुकाध्यक्ष आशा गरड, शहराध्यक्ष रवींद्र सुरवसे, वाय.डी. कोल्हे आदी उपस्थित होते.

गोपीचंद पडळकर म्हणाले, होळकरांच्या जमिनी लाटणारांना सध्या होळकरशाहीचा पुळका आला असून त्या भांडवलावर राजकारणात पुन्हा जम बसवता येईल. या भ्रमात राज्यातील काही जण आहेत. त्यांनी राज्यात जातीय तेढ निर्माण करण्यासाठी बाजारु विचारवंतांची फौज नेमली आहे. मात्र बहुजनांनी आता जागे होवून या लोकांचा कुटील डाव ओळखण्याची गरज आहे, असे प्रतिपादन आमदार पडळकर यांनी केले.

Gopichand Padalkar, Monika Rajale BJP
मोनिका राजळे म्हणाल्या, युती सरकारच्या काळात भारनियमन नव्हते...

ते पुढे म्हणाले की, अहल्यादेवींनी मंदिरांच्या जीर्णोधार करुन हिंदू समाज रक्षणाचे काम केले. त्यामुळे त्यांच्या जयंतीनिमित्त देशभर ऊर्जेचे वातावरण आहे. कौटुंबिक दु:खाच्या प्रसंगात देखील समाजासाठी अत्यंत धिरोदात्तपणे लढलेल्या राजमाता अहल्यादेवीमुळे अनेक महिलांना समाजासाठी काम करण्याची जिद्द निर्माण झाली. आमदार मोनिका राजळे देखील त्याच पावलावर पाऊल ठेवून मतदार संघात काम करत आहेत, असे त्यांनी सांगितले.

Gopichand Padalkar, Monika Rajale BJP
रोहित पवारांनी अहल्यादेवी होळकरांच्या जयंतीची चौंडीत केली तयारी : राम शिंदेंची झाली कोंडी

अहल्या जागर यात्रा सुरू करणार

70 वर्षांत राज्यकर्त्यांना कधी अहल्यादेवी दिसल्या नाहीत. आता मात्र बारामतीतील आजोबा आणि नातवाला भविष्यातील राजकारणासाठी अहिल्यादेवींचा साक्षात्कार झाला आहे. अठरा पगड जातीत विखुरलेली राज्यातील जनता जातीपातीचे राजकारण करणारांना धारा देणार नाहीत. राज्यभरात अहल्या जागर यात्रा सुरु करणार असल्याचे पडळकर यांनी जाहीर केले.

आमदार राजळे म्हणाल्या की, महाराष्ट्राच्या जडणघडणीत अहल्यादेवींनी केलेल्या मंदिर व बारवांच्या जीर्णोधाराच्या कामामुळे भविष्यातील वाटचालीसाठी पाणी व धर्म यांची आवश्यकता लक्षात येते. समाजाच्या मागणीनुसार सभामंडप उभारणी व शहरातील खंडोबा मंदिर परिसरातील जागेच्या विकासासाठी प्रयत्न करु. त्यामुळे शहराच्या वैभवात भर पडेल व समाजाची देखील सेवा होईल.

Gopichand Padalkar, Monika Rajale BJP
अहल्यादेवी होळकर युवा व्यवसाय समृद्धी अभियान जाहीर करा ः जानकर यांची पंतप्रधानांकडे मागणी 

जिल्हाध्यक्ष मुंढे म्हणाले की, अहिल्यादेवीची विचारसरणी व धनगर समाजाला न्याय देण्याचे काम भाजपने केले. त्यामुळे इतर मागासवर्गीयांमध्ये भाजपबद्दल अत्मियता आहे.

यावेळी अमोल काळे, संजय मिसाळ, किसन कर्डीले, यश गाढे, योगेश तोतरे, आत्माराम कुंडकर, अमृत काळे, शिवाजी तोतरे, संदिप वीर, गोकुळ वीर, अशोक गाढे, कैलास सोनवणे आदींनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले. हरिभाऊ नजन यांनी कार्यक्रमाचे प्रास्तविक तर दीपक कुसळकर यांनी सूत्रसंचालन केले. सुनील रासने यांनी आभार मानले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com