Karad : ग्रीन कॉरिडॉरच्या पाचशे एकरवर ॲग्रो इंडस्ट्री पार्क; स्थानिकांना प्राधान्य...

Eknadh Shinde मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न यशवंतराव चव्हाण यांनी केला.
IN karad CM Eknath Shinde
IN karad CM Eknath Shindesarkarnama

कराड : ग्रीन कॉरिडॉरसाठी सात हजार एकर जमीन संपादित केली जाणार आहे. त्यामधील 500 एकर जमिनीत ॲग्रो इंडस्ट्री पार्क होईल. त्यासाठी आवश्यक ती मदत करू. त्यातून स्थानिक भूमिपुत्रांना फायदा होईल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज कराड येथे केली.

कराड येथे यशवंतराव चव्हाण कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते. उत्पादन शुल्क मंत्री तथा पालकमंत्री शंभूराज देसाई, उद्योग मंत्री उदय सामंत, खासदार श्रीनिवास पाटील, रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार बाळासाहेब पाटील, जयकुमार गोरे, महेश शिंदे, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलिस अधीक्षक समीर शेख आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न यशवंतराव चव्हाण यांनी केला. राजकारण, खुर्च्या सत्ता पदे येतात जातात. यशवंतराव चव्हाण यांचे गुण राज्यकर्ते यांनी घेतले पाहिजे. सर्व सामान्य माणसाच्या अपेक्षेप्रमाणे न्याय देण्याचे काम आम्ही करत आहोत. आम्ही घेतलेला निर्णय आम्ही सर्वसामान्य लोकांच्या मनांतील निर्णय घेतला आहे. परंपरा शेतील आधुनिक जोड मिळायला सुरुवात झाली आहे.

IN karad CM Eknath Shinde
Karad : पृथ्वीराज चव्हाणांच्या विकास कामांचे एकनाथ शिंदेंच्या हस्ते होणार उद्‍घाटन 

अन्नदाता शेतकऱ्यांना न्याय आम्ही देत आहेत. कृषी प्रदर्शनाचा लाभ घेतला पाहिजे. मी मुख्यमंत्री झालो याचा आपल्या सर्वांना आनंद आहे. त्यामुळे माझी जबाबदारी वाढली आहे. आतापर्यंतचे निकष बदलून नुकसान भरपाई दिली. 50 हजारचा लाभ 7 लाख शेतकऱ्यांना दिला आहे. सर्वसामान्य लोकांची दुःख जाणून आंही काम करत आहेत. भूविकास बँकेची 964 कोटी कर्जमाफी केली. कृषी विद्यापीठ आणि शेतकरी यांच्या समन्वय असला पाहिजे.

IN karad CM Eknath Shinde
माण औद्योगिक कॉरिडॉर होणार?; काय म्हणाले, अजितदादा !

ग्रीन कॉरिडॉरसाठी सात हजार एकर जमीन संपादित केली जाणार आहे. त्याधील 500 एकर जमीन ऍग्रो इंडस्ट्री पार्क होईल, त्यासाठी आवश्यक ती मदत करू. त्यातून स्थानिक भूमिपुत्रांना फायदा झाला पाहिजे. बहुउद्देशीय कृषी संकुल उभारण्यासाठी 50 कोटींची तरतूद पालकमंत्री शंभूराजे देसाई यांनी केले आहे, त्यासाठी आणखी निधी देऊ.

IN karad CM Eknath Shinde
Karad : कराड दक्षिणमधून अतुल भोसलेंनाच आमदार करा... जयकुमार गोरे

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com