विशाल फटेनं बोट दाखवलेला 'सांगलीवाला' आला रडारवर!

विशाल फटे (Vishal Phate) याने बार्शीतील नव्या गैरव्यवहाराला तोंड फोडले होते.
Vishal Phate
Vishal Phate Sarkarnama

सोलापूर : कोट्यवधींचा गंडा घालणारा विशाल फटे (Vishal Phate) हा सध्या पोलीस (Police) कोठडीची हवा खात आहे. बार्शीचा हर्षद मेहता (Harshad Mehta) अशी ओळख असलेल्या फटेने 'सांगलीवाला' असे म्हणत एका नव्या गैरव्यवहाराकडे बोट दाखवले होते. सांगलीवाल्याचे गावगुंड असलेले एजंट वसुली करीत आहेत, असे त्याने म्हटले होते. आता हा सांगलीवाला रडारवर आला आहे.

विशाल फटेने बार्शीतील सांगलीवाल्याच्या गैरव्यवहाराला तोंड फोडले होते. त्याने म्हटले होते की, एस.एम.ग्लोबल सांगलीवाला फरार आहे. त्याचे बार्शीत 14 एजंट पैसे गोळा करीत आहेत. त्यावर कोण बोलत नाही कारण ते गावगुंड आहेत. सांगलीवाल्याच्या विरोधात कुणीच बोलत नाही. तो पैसे घेऊन दुबईत जाऊन बसला आहे. त्याने तिथे जाऊन बिझनेस सुरू केला आहे.

यावर आता शिवसेना (Shivsena) नेते व माजी पोलीस निरीक्षक भाऊसाहेब आंधळकर (Bhausaheb Andhalkar) यांनी याबाबत संकेत दिले आहेत. त्यांनी म्हटले आहे की, ग्लोबल प्लॉटचे बार्शी शहरांमध्ये 14 एजंट असल्याप्रकरणी लवकरच गुन्हा दाखल होईल. याची काळजी करू नको. तुझ्या माथ्यावर हे सगळं खापर फोडल असतं. तू हजर झालास. तू हुशार आहेस. सर्व गोरगरीब जनतेचे पैसे देऊन टाक दोन नंबरच वाल्यांचा काळा पैसा देण्याची आवश्यकता नाही. फक्त माझ्या गरीबांचा, शेतकरी, कामगार अन् कष्टकऱ्यांचा पैसा असेल तर तो देऊन टाक. जय महाराष्ट्र!

Vishal Phate
बार्शीच्या विशाल फटे प्रकरणात आता आंधळकरांची उडी

मागील काही दिवसांपासून फरार विशाल फटे हा 17 जानेवारीला यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून सगळ्यांसमोर आला होता. त्याने पोलिसांपुढे हजर राहणार असल्याचे जाहीर केले होते. फटे हा कर्नाटकात पळून गेला होता. तेथून तो एसटी बसने सोलापुरात आला. सोलापूर बस स्थानकावरून तो 17 जानेवारीला रात्री आठच्या सुमारास रिक्षातून पोलिस अधीक्षक कार्यालयात पोचला. तेथील पोलिसांनी त्याला ओळखले नाही. यावर त्यानेच विशाल फटे अशी ओळख सांगितली. पोलिसांनी त्याला तातडीने ताब्यात घेऊन अटकेची कारवाई केली. त्याला बार्शी येथील न्यायालयात 18 जानेवारीला हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला दहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

Vishal Phate
भावाच्या पत्नीला भाजपनं फोडताच अखिलेश यादवांनी जाहीर आभार मानून दिला धक्का!

विशाल फटे याने बार्शीतीलच (Barshi Scam) नव्हे तर राज्यभरातील हजारो लोकांना गंडा घातल्याची चर्चा आहे. अजूनही फटेविरोधात पोलिसांकडे तक्रारी दाखल होत आहेत. त्यामुळे या प्रकरणाची व्याप्ती आणखी वाढत आहे. आतापर्यंत सुमारे 81 तक्रारी पोलिसांत दाखल झाल्या असून, फसवणुकीचा आकडा 25 कोटी रुपयांपर्यंत वाढला आहे. मात्र, अनेकांच्या तक्रारी अजून येत असल्यामुळे हा आकडा वाढण्याची चिन्हे आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com