Satara : शिवेंद्रसिंहराजेंची एन्ट्री अन्‌ पालकमंत्र्यांचा फोन झाला कट...

मजूर फेडरेशनच्या Majur fedaretion निवडणुकीसाठी Election येत्या रविवारी Saturday मतदान voting असून त्यासाठी मतांचा आकडा जूळविण्यासाठी भाजपचे BJP नेते प्रयत्न करत आहेत.
Shivendraraje Bhosale, Shambhuraj Desai
Shivendraraje Bhosale, Shambhuraj Desaisarkarnama

सातारा : मजूर फेडरेशनच्या निवडणुकीसाठी मतांची बेरीज जुळविण्याचे प्रयत्न भाजपच्या नेत्यांकडून सुरु आहेत. त्यासाठी भेटीगाठीचे सत्र सुरु असून या पार्श्वभूमीवर आज खासदार उदयनराजेंचे काही समर्थक पालकमंत्री शंभूराज देसाई यांना भेटायला त्यांच्या कोयना दौलत या निवासस्थानी गेले होते. पालकमंत्री उदयनराजेंशी मोबाईलवरुन बोलत असतानाच आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या समोर उभे ठाकले. त्याचवेळी पालकमंत्र्यांचा फोनही कट झाला. अन॒ दोघेही एकमेकांकडे पाहून हसले.

सातारा पालिकेची निवडणुकीच्या निमित्ताने मध्यंतरी साताऱ्यातील दोन्ही राजांमध्ये कलगीतूरा रंगला होता. पण, नंतर हा वाद शांत झाला. आता मजूर फेडरेशनच्या निवडणुकीच्या निमित्ताने सध्या नेत्यांच्या गाठीभेटी वाढल्या आहेत. येत्या रविवारी मतदान असून त्यासाठी मतांचा आकडा जूळविण्यासाठी भाजपचे नेते प्रयत्न करत आहेत.

त्यासाठी मतांचा आकडा जुळविण्यासाठी खासदार उदयनराजे भोसले यांचे पालकमंत्र्यांकडे काम होते. ते काम घेऊन त्यांचे समर्थक सुनील काटकर व इतर पालकमंत्री देसाई यांच्या कोयना दौलत या निवासस्थानी गेले होते.

Shivendraraje Bhosale, Shambhuraj Desai
Satara : उदयनराजे समर्थक पालकमंत्र्यांना भेटले अन्‌ शिवेंद्रसिंहराजेंची एन्ट्री झाली...

यावेळी उदयनराजेंशी पालकमंत्री मोबाईलवरुन बोलत होते. हा संवाद सुरु असतानाच तेथे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे आगमन झाले. त्यामुळे उपस्थितांच्या भुवया उंचावल्या. शिवेंद्रसिंहराजेंना पाहून पालकमंत्र्यांनी हे बघा तुमचे बंधूही आलेत, असे म्हणताच मोबाईल कट झाला. दोघेही एकमेकांकडे पाहून हसले. यानंतर उदयनराजे समर्थक तेथून बाहेर पडले व शिवेंद्रसिंहराजेंनी पालकमंत्र्यांशी चर्चा सुरू केली.

Shivendraraje Bhosale, Shambhuraj Desai
Satara : शिवाजी महाराजांचे स्मारक सातारा पालिकेकडे हस्तांतरीत करा... शिवेंद्रसिंहराजे

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in