पोलिसांकडून सदावर्तेंचा करेक्ट कार्यक्रम; मुंबई, साताऱ्यानंतर आता कोल्हापुरचा नंबर!

कोल्हापुरनंतर अकोला आणि पुणे पोलिसांना ताबा मिळण्याची शक्यता, बीड, सोलापूर पोलिसांच्याही रडारवर
पोलिसांकडून सदावर्तेंचा करेक्ट कार्यक्रम; मुंबई, साताऱ्यानंतर आता कोल्हापुरचा नंबर!
Gunratna Sadavarte news updatesarkarnama

मुंबई : सिल्वर ओक हल्ल्याला चिथावणी देणे, एसटी कर्मचाऱ्यांकडून पैसे गोळा करणे, मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान भडखाऊ वक्तव्य करुन समाजात तेढ निर्माण करणे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांबद्दल अवमानकारक वक्तव्य करणे अशा विविध आरोपांमुळे अॅड. गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavrte) यांच्यामागे महाराष्ट्रभरातील पोलिसांचा ससेमिरा लागला आहे. यापूर्वी त्यांना यातील आरोपांमुळे मुंबई (Mumbai Police) आणि सातारा पोलिसांनी (Satara Police) ताब्यात घेतले होते. त्यानंतर आता सदावर्तेंचा ताबा मिळवण्यात कोल्हापूर पोलिसांना यश आले आहे.

आज साताऱ्यात जामिन मिळवल्यानंतर आणि मुंबईत न्यायालयीन कोठडी कायम ठेवण्यात आल्यानंतर कोल्हापूर आणि अकोला पोलिसांनी मुंबई न्यायालयात सदावर्तेंचा ताबा घेण्यासाठी दावा केला. मात्र यात कोल्हापूर पोलिसांचा दावा पहिल्यांदा आल्यामुळे सदावर्ते यांची आजची रात्र कोल्हापुरमध्ये जाणार आहे. कोल्हापूर पोलिसांकडून त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले असून, आजच त्यांना आर्थर रोड कारागृहातून घेवून पोलिस कोल्हापुरकडे रवाना होणार आहेत. कोल्हापुरमध्ये सदावर्ते यांना जामिन किंवा न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतरच त्यांना अकोला पोलिस ताब्यात घेणार आहेत.

Gunratna Sadavarte news update
सदावर्तेंना सातारा न्यायालयाकडून जामीन मंजूर

दरम्यान सदावर्ते यांनी कोल्हापूर आणि अकोला न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. कोल्हापूरमध्ये काल सुनावणी पार पडली. मात्र आवश्यक कागदपत्रे न उपलब्ध झाल्याने कालची सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. या अर्जावर आता गुरुवारी सुनावणी होणार आहे. तर अकोला सत्र न्यायालयात देखील सदावर्ते यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. यावर आज सुनावणी पार पडली. मात्र ही सुनावणी शुक्रवार पर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. याशिवाय मुंबई पोलिसांनीही आज सदावर्तेंच्या पोलिस कोठडीची मागणी केली होती. मात्र त्यांची न्यायालयीन कोठडी कायम ठेवण्यात आली आहे.

Gunratna Sadavarte news update
सदावर्ते अडकताच त्यांच्या पत्नी जयश्री पाटील गायब; पोलीस संरक्षणही सोडलं!

सदावर्ते यांना ताब्यात घेण्यासाठी पुणे पोलिसांनी देखील प्रयत्न सुरु केली असल्याची माहिती आहे. त्यांच्यावर भारती विद्यापीठ पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये त्यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. सोलापूरमध्येही त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे आगामी काळात सदावर्ते यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.