कोरोनाला पराभूत करून रोहित पवार कर्जतच्या रिंगणात

आता रोहित पवार ( Rohit Pawar ) कोरोनातून बरे झाले आहेत. उद्या ( बुधवारी ) ते कर्जतमध्ये येणार आहेत.
Rohit Pawar
Rohit Pawar Sarkarnama

अहमदनगर - कर्जत नगरपंचायत निवडणुकीतील दुसऱ्या टप्प्याला सुरवात झाली आहे. भाजपने कालपासून ( सोमवार ) प्रचाराला सुरवात केली आहे. आमदार रोहित पवार यांना कोरोना झाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रचार काहीसा थंडावला होता. मात्र आता रोहित पवार ( Rohit Pawar ) कोरोनातून बरे झाले आहेत. उद्या ( बुधवारी ) ते कर्जतमध्ये येणार आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या ( NCP ) गोटात उत्साहाचे वातावरण आहे. After defeating Corona, Rohit Pawar in Karjat's arena

भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष राम शिंदे यांनी काल भाजपच्या प्रचाराला सुरवात केली. मात्र रोहित पवार नसल्यामुळे राष्ट्रवादीच्या प्रचाराला धार नव्हती. आमदार रोहित पवार यांनी आज रात्री ट्विट करत आपण कोरोनातून बरे झाल्याचे कळवत आगामी दौऱ्याचा कार्यक्रम जाहीर केल्याने राष्ट्रवादीच्या गोटात आनंदाचे व उत्साहाचे वातावरण पसरले आहे.

Rohit Pawar
कर्जतचे सत्ताकारण : रोहित पवार-राम शिंदे यांच्यातील स्पर्धेचा इंटर्व्हल संपला...

रोहित पवार यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, कोरोनामुळं थोडा त्रास होत असताना आपल्या सर्वांच्या सदिच्छा, प्रेम आणि वडीलधारी मंडळींच्या आशिर्वादामुळं मी त्यातून यशस्वीपणे बाहेर पडलो. आता माझी तब्येत उत्तम आहे, त्यामुळं उद्या माझ्या मतदारसंघातील कर्जत शहराच्या दौऱ्यापासून मी पुन्हा नव्या जोमाने आपल्या सेवेत हजर होत आहे, असे सांगितले आहे. शिवाय 18 जानेवारी पर्यंतचे दौऱ्याचे वेळापत्रक दिले आहे.

Rohit Pawar
ही तर राम शिंदे यांची स्टंटबाजी : रोहित पवारांचा पलटवार

18 जानेवारीला कर्जत नगरपंचायतचे चार प्रभागांसाठी मतदान होईल तर 19 जानेवारीला सर्व 17 प्रभागांची मतमोजणी होणार आहे. त्यामुळे आमदार रोहित पवार यांची एन्ट्री ही धमाकेदार होणार हे आता स्पष्ट झाले आहे. रोहित पवार भाजपच्या आरोपांना काय उत्तर देणार याकडे राज्याचे लक्ष्य लागले आहे. रोहित पवार व राम शिंदे यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केल्याने ही निवडणूक राज्यभर चर्चेचा विषय ठरली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in