'महाराष्ट्राला ब्राम्हण मुख्यमंत्रीच पाहिजे'; दानवेंपाठोपाठ रामदास आठवलेंचीही मागणी

Raj Thackeray| Ramdas Athawale| BJP-MNS| मनसे बरोबर भाजपची युती करणं हे भाजपला परवडणार नाही
Ramdas Athwale news
Ramdas Athwale news

Ramdas Athwale latest political news

सांगली : महाराष्ट्रात दुसरा मुख्यमंत्री हा ब्राम्हण समाजाचा होईल आणि ते मुख्यमंत्री म्हणजे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) असतील, असे मंत्री रावसाहेब दानवे यांनी सांगितले. फडणवीस हे सक्षम असणारे नेतृत्व आहे, गेल्या पाच वर्षात त्यांनी भाजपला ताकद देण्याचं काम केलं आहे. राज ठाकरेंचीही (Raj Thackeray) समाजात वाद निर्माण करणारी आहे. राज यांची भूमिका सामाजिक नाही तर धार्मिक आहे, त्यामुळे उत्तर प्रदेशात राज ठाकरेंना विरोध होत असावा, असे मत केंद्रिय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी मांडले आहे. सांगलीच्या आटपाडी मध्ये ते बोलत होते.

मनसे बरोबर भाजपची युती करणं हे भाजपला परवडणार नाही. मनसेला सोबत घेण्याचा भाजपने विचार करू नये. मी सोबत असताना भाजपला मनसेची गरज नाही, असे मत केंद्रिय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी मांडले आहे. सांगलीच्या आटपाडी मध्ये ते बोलत होते.

मनसेसोबत युती न करण्याचे कारणही रामदास आठवले यांनी सांगितले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सबका साथ सबका विकास, सबका विश्वास,' अशी ही भूमिका मांडली आहे. पण मनसेसोबत युती केल्यास त्या भूमिकेला तडा जाऊ शकतो. महाराष्ट्रात भाजप आणि आरपीआय सोबत येत सत्ता आणू आणि पुन्हा देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची आमची भूमिका आहे, असेही आठवले यांनी म्हटलं आहे.

याचवेळी त्यांनी राज ठाकरे बाळासाहेबांची कॉपी करु शकत नाहीत, असेही म्हटले आहे. भोंग्याच्या वादावरुनही त्यांनी आपले रोखठोक मत व्यक्त केले आहे. सगळ्या मुस्लिमांना त्रास देण्याची बाळासाहेब ठाकरेंची भूमिका कधीच नव्हती, त्यामुळे राज ठाकरे बाळासाहेबांची कॉपी करु शकत नाहीत. बाळासाहेबांची कॉपी करणं एवढं सोप नाही, असा शब्दांत त्यांनी मनसेला फटकारलं आहे. इतकेच नव्हे तर, आम्हाला मनसेची गरज नाही. त्यामुळे चूकीच्या भूमिका मांडणाऱ्या लोकांची भाजपला आवश्यकता नाही. भाजप त्यांना घेणारही नाही, भाजप विरोधकांशी लढण्यासाठी सक्षम असल्याचेही आठवले म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com