दीड वर्षानंतर घुमला शनिदेवाचा जयघोष

कोरोना ( Corona ) स्थितीमुळे दीड वर्षापासून बंद असलेले शनिमंदिर ( Shanimandir ) आज मोठ्या उत्साहात उघडण्यात आले.
दीड वर्षानंतर घुमला शनिदेवाचा जयघोष
ShanimandirVinayak Darandale

सोनई (अहमदनगर) : कोरोना स्थितीमुळे दीड वर्षापासून बंद असलेले शनिमंदिर आज मोठ्या उत्साहात उघडण्यात आले.पहाटे साडेचारच्या आरती नंतर दर्शनपथमध्ये 'सूर्यपुत्र शनिदेव की जय'चा जयघोष करत भाविकांनी स्वयंभू शनिमूर्तीचे दर्शन घेतले. After a year and a half, the sound of cheering of God Shani

पहाटे साडेचार वाजता महंत त्रिंबक महाराज यांच्या हस्ते आरती सोहळा झाल्यानंतर दर्शनपथचे सरंक्षण कठडे काढण्यात आले.महाद्वार परीसरात भाविकांनी थर्मल स्कॅनिंग व हातावर सॅनीटायझर घेतल्याची खात्री झाल्यानंतर दर्शनासाठी सोडण्यात आले.दर्शन रांगेत प्रथम असलेल्या आरती व साईनाथ यादव रा.बस्तीन(उत्तरप्रदेश)यांचा सत्कार मंदीर विभाग प्रमुख विठ्ठल आढाव व पुरोहित अशोक कुलकर्णी यांनी केला.

Shanimandir
शनि शिंगणापूरला जाताय ! आधी सामना `लटकुं`च्या साडेसातीचा

मंदिर उघडणार असल्याने गावातील पूजासाहित्य, तेलविक्री,चहा व नाश्त्याचे हॉटेल उघडले होते. देवस्थान व पोलिस यंत्रणेने ठिकठिकाणी सुचनांचे फलक लावले होते. रस्त्यावर लटकू,छायाचित्र काढणारे व भिकाऱ्यांनी मोठी गर्दी केल्याने दर्शन व्यवस्थेत काही तास अडचण झाली होती.सर्वांना चौथऱ्याखालूनच दर्शन असले तरी प्रत्येकाच्या हातात पूजेचे ताट दिसले.

Shanimandir
एकनाथ खडसे म्हणतात...'शनि' मागे लागलाय म्हणून शनिच्या दर्शनाला निघालोय 

पूजा साहित्याचा अडसर..

दर्शन व्यवस्थेची प्रत्यक्ष पहाणी केली असता पुजेच्या ताटातील रुईच्या पानाचा हार व श्रीफळ वाहण्याच्या ठिकाणी तसेच चौथऱ्यासमोर इतर पुजासाहित्य अर्पण करण्यास वेळ लागत असल्याने अधिक गर्दी पाहण्यास मिळाली.

येथे पूर्णपणे ऑफलाईन दर्शन असुन शासन नियमांचे पालन करुन भाविकांना दर्शनासाठी मंदीरात सोडणार आहे. मूर्तीस्पर्श नसल्याने सर्वांना चौथऱ्या खालूनच दर्शन आहे. येथील व्यावसायिकांनाही शासन नियमाबाबत सुचना देण्यात येईल.

- जी. के. दरंदले, कार्यकारी अधिकारी, शनैश्वर देवस्थान

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in