Satara : रिटायर्डमेंटचा सल्ला देणे हा त्यांचा चोंबडेपणाच... उदयनराजे

प्रसिद्ध दादांनी Ajit Pawar देखील भाजपबरोबर BJP उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. हे भाजपात गेले म्हणून सर्व घडले असे देखील आता बडबडतील त्यांच्या बडबडीला आमच्या लेखी काडीची किंमत नाही.
Udayanraje Bhosale, Shivendraraje Bhosale
Udayanraje Bhosale, Shivendraraje Bhosalesarkarnama

सातारा : ज्यांना जनतेने नगरपरिषदेसाठी रिटायर्ड केले आहे त्यांनी सातारा विकास आघाडीने रिटायर्डमेंट घ्यावी, असा सल्ला देणे म्हणजे चोंबडेपणा आहे. आमदारांचा रियल इस्टेटचा धंदा कमी झाला असल्यास त्यांनी चोंबडे सल्ले देण्याचा नवीन व्यवसाय सुरू करावा, असे जोरदार प्रत्युत्तर खासदार उदयनराजे भोसले यांनी पत्रकाद्वारे दिले आहे.

आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी काल सातारा विकास आघाडीने रिटायर्डमेंट घ्यावी, असे वक्तव्य केले होते. या वक्तव्याचा उदयनराजेंनी पत्रकातून जोरदार प्रतिउत्तर दिले. त्यांनी म्हटले की, आमदारांनी चोंबडे सल्ले देण्याचा नवीन धंदा निश्चित सुरू करावा. ज्यांना जनतेने आधीच नगरपालिकेतून रिटायर्ड केले आहे, त्यांनी असले सल्ले देऊ नयेत. प्रशासकीय राजवट पालिकेत लागून एक वर्ष होत आहे.

नागरिकांचे मूलभूत प्रश्न सोडविण्याकरिता सातारा विकास आघाडी काहीच करत नाही, अशी बोंब मारणारेच ज्यावेळी कास जलपूजन केले, त्यावेळी सातारा विकास आघाडीचा काय संबंध अशी गरळ ओकत होते . प्रशासकीय राजवटीमध्ये नागरिकांची कामे होत नाहीत असे त्यांचे अप्रत्यक्ष म्हणणे म्हणजे नथीतून तीर मारण्याचा प्रकार आहे. दोन्ही डगरीवर हात ठेवणारे आमदार सैरभैर झाले आहेत.

Udayanraje Bhosale, Shivendraraje Bhosale
शिवेंद्रसिंहराजे म्हणतात, उदयनराजेंना माझं बोलणं झोंबलं....

कुरतडलेली दाढी आणि भुरकट मिशांवर ताव देण्यापेक्षा कोणाला आलिंगन देणे केव्हाही चांगले. यांच्यासारखे पोटात एक आणि ओठात एक असे आमचे तरी नाही, असा टोला उदयनराजेंनी लगावला. निष्ठा दाखवायला लागत नाही तर, ती आपोआप प्रदर्शित होते. आपण भाजपमध्ये असताना सुमारे अडीच वर्ष कोणाची टीमकी वाजवली हे जनतेला माहित आहे. आता तुमची निष्ठेची नाटके सुरू झाली आहेत. आम्ही भाजपमध्ये जाणार याची काणकुण लागताच यांनी भाजपला जवळ केले.

Udayanraje Bhosale, Shivendraraje Bhosale
Satara : शेतकऱ्यांकडे दूर्लक्ष नको.. अन्यथा, हातात वाडगं घेऊन बसावे लागेल... उदयनराजे भडकले

त्यामुळेच आम्ही भाजपाने जाण्याचा निर्णय लांबवला. ते भाजपात गेले म्हणून नंतर आम्ही गेलो, हा अर्थ काढत असतील तर ते चुकीचे आहे. प्रसिद्ध दादांनी देखील भाजपबरोबर उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. हे भाजपात गेले म्हणून सर्व घडले असे देखील आता बडबडतील त्यांच्या बडबडीला आमच्या लेखी आणि जनतेच्या लेखी काडी मात्र किंमत नाही. आम्ही हत्तीच्या चालीने चाललो आहोत त्यामुळे इतरांच्या भुंकण्याकडे आम्ही लक्ष देत नाही. पेन्शनर सिटी चे स्मार्ट सिटीत रूपांतर करण्यासाठी सातारा विकास आघाडी वचनबद्ध आहे. नागरिकांची साथ कोणाला मिळेल हे येणारा काळच ठरवेल, असा टोला उदयनराजे यांनी लगावला आहे.

Udayanraje Bhosale, Shivendraraje Bhosale
Satara : शिवाजी महाराजांचे स्मारक सातारा पालिकेकडे हस्तांतरीत करा... शिवेंद्रसिंहराजे

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in