मोठी बातमी : 25 ZP आणि 284 पंचायत समित्यांत 20 मार्चपासून प्रशासक

राज्य शासनाने राजपत्र काढत राज्यातील 25 जिल्हा परिषदा व 284 पंचायत समित्यांत प्रशासक नियुक्त करण्याचे आदेश काढले आहेत.
मोठी बातमी :  25 ZP आणि 284 पंचायत समित्यांत 20 मार्चपासून प्रशासक
ZP AdministratorSarkarnama

मुंबई - राज्य शासनाने राजपत्र काढत राज्यातील 25 जिल्हा परिषदा व 284 पंचायत समित्यांत प्रशासक नियुक्त करण्याचे आदेश काढले आहेत. या जिल्हा परिषदा व अमरावती पंचायत समिती वगळता सर्व संबंधित पंचायत समित्यांची मुदत 20 मार्चला संपत आहे. अमरावती पंचायत समितीची मुदत 24 जूनला संपत आहेत. मुदत संपल्यावर प्रशासक नियुक्तीचे आदेश काढण्यात आले आहेत. ( Administrator to 25 Zilla Parishads in the state from 20th March )

राज्यातील मुदत संपणाऱ्या 25 जिल्हा परिषदा व 284 पंचायत समित्यांच्या मुदत संपणार असल्या तरी तेथे लगेच निवडणुका होणार नाहीत. विधीमंडळात नुकताच निर्णय सर्वानुमते घेण्यात आला आहे. त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाचे आदेश मध्यप्रदेशच्या धर्तीवर राज्य सरकार घेणार आहे. त्यामुळे निवडणुका होईपर्यंत संबंधित जिल्हा परिषदांत मुख्य कार्यकारी अधिकारी व पंचायत समित्यांत गट विकास अधिकारी प्रशासक म्हणून काम पाहतील.

ZP Administrator
अहमदनगर जिल्हा परिषद, पंचायत समितीवर सीईओ होणार प्रशासक

यात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, जळगाव, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, बीड, नांदेड, उस्मानाबाद, लातूर, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर व गडचिरोली या जिल्यांतील जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांचा समावेश आहे. या निर्णयानंतर चार महिने किंवा निवडणुकीनंतर पदे भरली जात नाही तोपर्यंत प्रशासक कामकाज पाहणार आहेत.

ZP Administrator
गुड न्यूज : जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य संख्या वाढणार

काही जिल्हा परिषदांत प्रशासकीय पेच

अहमदनगर सह राज्यातील काही जिल्हा परिषदांच्या मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. त्या जागी नवीन नियुक्ती झालेली नाही. त्यामुळे अशा जिल्हा परिषदांवर प्रशासक म्हणून कोण काम पाहणार यावर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. या प्रशासकीय पेचावर संबंधित विभागीय आयुक्तांना निर्णय घ्यावा लागणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in