Aditya thackeray : 'खोके सरकार' म्हंटल्यावर इतकं का झोंबतय?

Aditya thackeray : ५० आमदारांच्यावतीने प्रत्येकी ५० कोटी असे २ हजार ५०० कोटींचे अब्रुनुकसानीचे दावा
Aditya Thackeray
Aditya ThackeraySarkarnama

संगेवाडी (सोलापूर) : खोके घेऊन सरकार स्थापन झाले आहे, असे आरोप करणारे शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना कायदेशीर नोटीस देण्याचा इशारा शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी दिलं आहे. आता यावर आदित्य ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ‘ज्यांना नोटीस द्यायची असेल, त्यांनी अगोदर खोके म्हटल्यावर का झोंबले हे सांगावे आणि मग नोटीस द्यावी’, असा सणसणीत टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला.

शिवतारे यांनी म्हंटले होते, “सुप्रिया सुळे म्हणतात की, जर माझ्यावर कोणी असे आरोप केले असते, तर मी त्याला नोटीस दिली असती. मी त्याच्यावर अब्रुनुकसानीचा दावा केला असता, सुप्रिया सुळेंचा हा सल्ला आम्ही ऐकलेला आहे. मुख्यमंत्र्यांशी माझी बऱ्याच आमदारांशी माझी चर्चा झाली आहे. हे कुठंतरी थांबलं पाहिजे.

Aditya Thackeray
राज्य बाजार समितीच्या शिखर संघावर राष्ट्रवादीचे वर्चस्व कायम !

"पन्नास खोके, एकदम ओके’ अशा आरोपांमुळे राज्यातील जनतेच्या मनात सरकारविषयी विनाकारण संभ्रम निर्माण होत असेल, तर कायदेशीर लढाईचे पाऊल उचलले जायला हवे, असा निर्णय शिंदे गटाने घेतला आहे. तर निश्चितपणे ५० आमदारांच्यावतीने प्रत्येकी ५० कोटी असे २ हजार ५०० कोटींचे अब्रुनुकसानीचे दावे, मानहानीचे खटले, उद्या त्याची प्रक्रिया सुरू होत आहे, नोटीसा दिल्या जातील.” असेही विजय शिवतारे म्हणाले.

Aditya Thackeray
जामीन मंजूर होताच राऊत आधी गोंधळले, मग भावूक झाले अन् पानावलेल्या डोळ्यांनी म्हणाले...

खोके म्हणजे काय? खोके म्हणल्यावर तुम्हाला ऐवढा राग का येतोय. का झोंबतय, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला आहे. आम्ही सध्या गावातील शेतीच्या बांधावर जातोय. परतीच्या पावसाने कपाशी,सोयाबीन अशा अनेक पिकांचं नुकसान झालंय. इथल्या हवालदील शेतकऱ्याने अस्मानी संकटासोबतच पोकळ आश्वासनं देणाऱ्या ‘खोटे सरकार’ विरोधात स्वतःच्या हक्कासाठी लढायला सज्ज व्हावं, आम्ही त्यांच्या सोबत आहोत, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com