आदित्य ठाकरे गर्जले : प्रेम व विश्वासाचे अपचन झाल्याने त्यांना आमच्यावर राग

शिवसंपर्क अभियाना अंतर्गत शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे ( Aditya Thackeray ) व माजी खासदार चंद्रकांत खैरे हे आज अहमदनगर जिल्ह्यात दाखल झाले.
Aditya Thackeray
Aditya ThackeraySarkarnama

अहमदनगर - शिवसंपर्क अभियाना अंतर्गत शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे ( Aditya Thackeray ) व माजी खासदार चंद्रकांत खैरे हे आज अहमदनगर जिल्ह्यात दाखल झाले. त्यांचे नेवासा फाटा येथील राजमुद्रा चौका शिवसेनेचे युवा नेते उदयन गडाख, शिवसेनेचे अहमदनगर उत्तर जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे व शिवसैनिकांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले. यावेळी पाऊस सुरू असूनही मोठ्या संख्येत शिवसैनिक जमले होते. या प्रसंगी बोलताना त्यांनी बंडखोर आमदारांवर जोरदार टीका केली. ( Aditya Thackeray roared: He is angry with us because of indigestion of love and trust )

आदित्य ठाकरे म्हणाले, तिथे गेले त्याच्यावर काही दडपण असेल. तिथे रहायचे आनंदात रहा. हिंमत असेल तर आमदारकीचा राजीनामा द्या आणि निवडणुकीला सामोरे जा. दाखवा तुम्ही काय काम केले. तुम्ही का गद्दारी केली, हे लोकांना पटवून द्या. महाराष्ट्र कधी गद्दारी खपवून घेत नाही आणि घेणारही नाही, असा इशाराही यावेळी त्यांनी दिला.

Aditya Thackeray
गडाखांच्या सभेनंतर मला ताकद व हिंमत आली : आदित्य ठाकरे

ते पुढे म्हणाले, गद्दार आमच्या बद्दल बोलत आहे. उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरेंबद्दल आदर आहे. प्रेम आहे. मागील दोन दिवसांत ते जे बोलले आहेत. त्यातून त्यांच्या मनात जे होते ते बाहेर येऊ लागले आहे. त्यांच्या मनात आमच्या विषयी राग व द्वेष यासाठी असेल की, आम्ही प्रेम जास्त दिले. विश्वास जास्त दाखविला. त्यांना अपचन झालं. त्यामुळे त्यांना आमच्यावर राग असेल, असा टोलाही त्यांनी लगावला.

Aditya Thackeray
कैसे छोड दू अकेला उनको, जिसे हराने सारी दुनिया एक हो चूकी है..!

उद्धव ठाकरेंची ही चूक झाली

त्यांना वाटत असेल एका चांगल्या, भल्या माणसाच्या पाठीत खंजीर खुपसलाय. चूक केली आहे. तर या मातोश्रीचे दरवाजे त्यांच्यासाठी सदैव खुले आहेत. शिवसेना प्रमुख व शिवसैनिकांचे ह्रद्य मोठे आहे. उद्धव ठाकरे हे चांगले माणूस आहेत. त्यांनी अडीच वर्षांत एकच चूक केली. त्यांनी कधी राजकारण केले नाही. विरोधी पक्षाच्या मागे पोलीस लावले नाहीत. तडीपारीच्या नोटिसा काढल्या नाहीत. त्यांनी आपल्याच आमदार, खासदारांच्या मागे हेर ठेवले नाहीत. ही चूक आम्ही परत परत करू कारण विश्वास शिवसैनिकावर ठेवायचा नाही तर कोणावर ठेवायचा, असे त्यांनी स्पष्ट केले.

Aditya Thackeray
ओबीसी आरक्षण : उद्धव ठाकरे यांची संयत प्रतिक्रिया... मी मुख्यमंत्री नसलो तरी...

त्यांनी ही गद्दारी केवळ उद्धव ठाकरे व शिवसेने विरोधात केलेली नाही. तर महाराष्ट्र व माणूसकी विरोधात गद्दारी केली आहे. लवकरच मध्यावधी निवडणुका लागणार आहे. लवकरच हे राज्य सरकार कोसळणार आहे. मतदान करताना हे लक्षात ठेवा की मत तुम्ही कोणाला देणार आहात, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

उद्धव ठाकरे हे मनक्याचे ऑपरेशन होऊनही आठवड्या भरात कामाला लागले. कोविडचे रुग्ण वाढू नयेत म्हणून बैठका घेत होते. त्यावेळी 40 गद्दार व त्यांचे नेते जमवा जमव करत होते. कोण आमदार सोबत येतो. कोण मंत्री सोबत येतो. आत्ता सुद्धा त्यांचे तेच कार्य सुरू आहे. हे तुम्हाला पटते का? हे तुमचे शासनकर्ते होऊ शकतात का? राजकारण एवढे घाणेरडे झाले आहे की मी तरुणांना राजकारणात या हे कसे सांगू, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in