शंभुराज देसाईंच्या गावचे मैदान आदित्य ठाकरेंनी मारले; शिवसेनेमध्ये नवचैतन्य

Shivsena | Uddhav Thackeray | Aditya Thackeray : निष्ठा यात्रा यशस्वी करण्यात शिवसेनेचे नूतन जिल्हाध्यक्ष हर्षद कदमांना यश
Aditya Thackeray | Shivsena
Aditya Thackeray | Shivsena Sarkarnama

पाटण : शिवसेनेचे आमदार शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी बंड केल्यानंतर काल (मंगळवारी) पाटण तालुक्यात पहिल्यांदाच झालेल्या शिवसेनेच्या (Shivsena) सभेतील गर्दीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी बंडखोर आमदार देसाई यांचे नाव न घेता त्यांच्यावर जोरदार प्रहार करून मल्हारपेठचे राजकीय मैदान जिंकल्याचे बोलले जात आहे. माजी आमदार दगडूदादा सपकाळ, नरेंद्र पाटील यांच्या आक्रमक भाषणांनी सभेला रंगत आणली. एकूणच आदित्य ठाकरेंच्या निष्‍ठा यात्रेने तालुक्यातील शिवेसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य आणले आहे.

शिवसेनेत एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर पक्षात उभी फूट पडली. या फुटीच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांची निष्ठा यात्रा तालुक्यात यशस्वी करण्यात शिवसेनेचे नूतन जिल्हाध्यक्ष हर्षद कदम व सहकाऱ्यांना यश आले. कोणताही बडा राजकीय नेता सोबत नसताना आणि शिवसेनेचे आमदार देसाई यांनी बंडखोरी केली असताना सभेला लोक जमतील का? अशी सर्वांनाच शंका होती. अशातच दुपारी दोनला होणारी सभेची वेळ देखील टळत गेल्याने ही सभा होणार की नाही याबाबत चर्चा सुरु होत्या. मात्र तब्बल पावणेतीन तास उशिरा सभा सुरू होऊनही लोकं जागचे हलले नव्हते, हे या सभेचे वैशिष्ट्य ठरले.

Aditya Thackeray | Shivsena
सुजय विखेंचे शिवसेना खासदारांना आव्हान : मोदींच्या फोटो शिवाय निवडणूक लढवून दाखवावी

आदित्य ठाकरे यांनी संपूर्ण भाषणात बंडखोर आमदार देसाई यांचा कुठेही नामोल्लेख केला नाही. मात्र अर्धा तासाच्या भाषणात गद्दार, गद्दारी आणि विश्वासघात या तीन शब्दांनीच त्यांनी देसाईंचा समाचार घेतला. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ऑपरेशनची परिस्थिती आणि षडयंत्र याबाबत कडक शब्दात वारही केले. बंडखोरांना थोडी जरी लाज, शरम आणि हिम्मत असेल तर राजीनामा देऊन निवडणुकीला सामोरे जावे, असे आव्‍हान त्यांनी बंडखोरांना दिले. त्यास कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत दाद दिली.

Aditya Thackeray | Shivsena
एका राऊतांनी अर्धी शिवसेना संपवली.. उरलेली संपविण्यासाठी दुसरे राऊत पुरेसे...

तर दगडूदादा सपकाळ, नरेंद्र पाटील यांनी देसाई कुटुंबाच्‍या ५ वेळा झालेल्या पराभवावर बोट ठेवले. मात्र शिवसेनेमुळे आमदारकीचा टिळा लागला, असे डिवचताना दगडूदादांनी पुन्हा या गद्दाराला विधानसभा नाही, असा निश्चय केला. नरेंद्र पाटील यांनीही देसाई यांच्यावर निशाणा साधला. याशिवाय कोयना विभागापुरती मर्यादित शिवसेना वनकुसवडे पठार, मोरगिरी व ढेबेवाडी विभागात विस्तारतेय, हे या सभेने अधोरेखित केले आहे. या सभेने शिवसैनिकांचा उत्साह वाढला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in