Patan : आदित्य ठाकरे शंभूराज देसाईंवर बरसले... राजीनामा देऊन निवडून येऊन दाखवा...

अडीच वर्षे मजामस्ती करुन स्वार्थापोठी गद्दारी Treachery out of selfishness करणारे गुवाहाटीत Guwahati जाऊन मस्ती करत होते, असा घाणाघाती आरोप आदित्य ठाकरे Aditya Thackeray यांनी केला.
Aditya Thackeray, Shambhuraj Desai
Aditya Thackeray, Shambhuraj Desaisarkarnama

मल्हारपेठ : पाठीत खंजीर खुपसुन शिवसेना फोडण्याचे पाप आणि माणुसकीसोबत गद्दरी करणाऱ्यांना धडा शिकवण्याची, त्यांची जागा दाखवण्याची वेळ आली आहे. थोडी जरी हिंम्मत असेल तर आमदारकीचा राजीनामा देऊन निवडणूक लढवुन निवडुन येऊन दाखवा, असे थेट आव्हान युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी निष्ठा य़ात्रेदरम्यान माजी मंत्री आमदार शंभूराज देसाई यांना त्यांचे नाव न घेता दिले.

मल्हारपेठ येथील ग्रामपंचायती समोरील प्रांगणात शिवसेनेच्या निष्ठा यात्रेत युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे बोलत होते. खासदार विनायक राऊत, माजी आमदार दगडुदादा सपकाळ, शिवसेनेचे सचिव आदेश बांदेकर, सदाशिव सपकाळ, उपनेते नितीन बानुगडे-पाटील, शिवसेना जिल्हा प्रमुख हर्षद कदम, यशवंत घाडगे, उपजिल्हाप्रमुख रविंद्र पाटील, तालुका प्रमुख सुरेश पाटील यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.

Aditya Thackeray, Shambhuraj Desai
Sambhuraj Desai Video : कर नही तो डर क्यू ! शंभूराज देसाई

उठाव किवा बंड करायला ताकद लागते. मात्र, अडीच वर्षे मजामस्ती करुन स्वार्थापोठी गद्दारी करणारे गुवाहाटीत जाऊन मस्ती करत होते, असा घाणाघाती आरोप करून आदित्य ठाकरे म्हणाले, खरे शिवसैनिक असते तर तेथील पुरपरिस्थितीत जनतेला मदत केली असती. ४० आमदारांनी गुवाहाटीत जाऊन काय तमाशा केला, हे महाराष्ट्रातील जनतेने पाहिले आहे.

Aditya Thackeray, Shambhuraj Desai
पालापाचोळ्याची उपमा योग्य नाही; उद्धव साहेबांच्या तोंडी राऊतांची भाषा... शंभूराज देसाई

ज्या गद्दारांनी कोरोना काळात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हॉस्पीटलमध्ये असताना त्यांची काळजी घेण्याऐवजी वेळ साधुन गद्दारी करुन शिवसेना फोडण्याचे कटकारस्थान रचले जात होतो. अशा गद्दारांना वेळीच धडा शिकवण्याची वेळ आली आहे. राज्यात घाणेरडे राजकारण सुरु आहे. गेल्या महिनाभरापासुन दोन मंत्र्यांचे जंम्बॊ मंत्रिमंडळ अस्तित्वात आले असुन तिसरा लायकीचा मिळाला नाही, ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. अडीच वर्षात ४० गद्दारांची सत्तेची भुक वाढुन त्यांनी 'ईडी'ची पिडा मागे लागल्यामुळे शिवसेनेला वेटीस धरले. त्यांना आता माफी नाही, असाही इशारा त्यांनी दिला.

Aditya Thackeray, Shambhuraj Desai
जनतेच्या डोळ्यात अश्रू होते, तेव्हा हे ४० गद्दार निर्लज्जपणे टेबलावर नाचत होते...

देसाईंच्या बालेकिल्यात मोठी गर्दी

निष्ठा यात्रेसाठी आमदार आदित्य ठाकरे आज दुपारी दोन वाजता येणार होते. त्यामुळे सकाळपासुन कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. मात्र, त्यांचा दौरा अडीच तासाहुन अधिक काळ लांबला. तरीही सभेच्या ठिकाणी असणारी गर्दी तसुभरही कमी झाली नाही. आमदार शंभूराज देसाई यांच्या बंडखोरीनंतर ठाकरेंची झालेली सभेस प्रतिसाद कसा मिळेल का, अशी सर्वांना शंका होती. मात्र, सभेस मोठी गर्दी होती.

Aditya Thackeray, Shambhuraj Desai
सातारा शहर शिवसेना फुटणार; दहा पदाधिकारी शिंदे गटात सहभागी होणार

घोषणांतुन दिसली युवकांची चीड

निसरेफाटा येथे आमदार आदित्य ठाकरे यांचे आगमन झाले. तेथुन रॅलीने वाद्यांच्या गजरात त्यांची मल्हारपेठपर्यंत जोरदार शक्तीप्रदर्शन करत रॅली काढण्यात आली. यावेळी युवकांनी जोरदार घोषणाबाजी केली. शिवसेनेच्या आमदारांच्या बंडोखोरीनंतर युवकांत निर्माण झालेली चिढ त्यांच्या घोषणांतून दिसुन आली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com