आदित्य ठाकरेंनी शहाजीबापूंचं वाढवलं टेन्शन ..आबांचं नावं घेत म्हणाले..

Aditya Thackeray : खोकेबाज सरकारमुळे महाराष्ट्रात काहीच ओक्के नाही...
Aditya Thackeray Latest Ndews
Aditya Thackeray Latest NdewsSarkarnama

सांगोला : ओला दुष्काळ जाहीर करा, नाहीतर खुर्च्या खाली करा, असा इशारा देत युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतील तर महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मदत जाहीर केली असती. खोकेबाज सरकारला शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत जायाला वेळच मिळत नाही. मी तुमच्या व्यथा जाणून घेऊन शासन दरबारी निश्चितपणे मांडेन, असे मत आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केले. तर शिंदे गटाचे आमदार यांच्यावरहील टीका केली आहे. (Aditya Thackeray Latest Ndews)

सांगोला तालुक्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या संगेवाडी मंडलमधील संगेवाडी व मांजरी येथील नुकसान झालेल्या पिकांची पाहणी आदित्य ठाकरे व विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली. यावेळी संपर्कप्रमुख अनिल कोकीळ, जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे, तालुकाप्रमुख सूर्यकांत घाडगे, शहराध्यक्ष कमरुद्दीन खतीब, महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख आशाताई टोणपे व ॲड. पुनम अभंगराव, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख गणेश इंगळे, युवा सेनेचे विस्तारक उत्तम ऐवळे, लक्ष्मण हाके, शंकर मेटकरी, सुभाष भोसले, धनंजय डिकोळे, तुषार इंगळे, रघुनाथ गायकवाड, सौरभ चव्हाण, समाधान चव्हाण आदी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

Aditya Thackeray Latest Ndews
कारागृहाबाहेर पडल्यावर राऊतांची शिवसेना स्टाईलमध्ये पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

यावेळी शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकून घेतल्यानंतर आदित्य ठाकरे म्हणाले, महाविकास आघाडी सरकारच्या काळात उद्योगांमधील गुंतवणूक मोठ्या प्रमाणात झाली होती. मात्र आज या धोकेबाज सरकारच्या काळात येथील उद्योग महाराष्ट्राबाहेर जात आहेत. मंत्र्यांना बोलण्याची कोणतीही तमा राहिली नसून महिलांचा अनादर हे करीत आहेत. आज महाराष्ट्रामध्ये काहीच ओक्के नसून सत्ताधारी फक्त मजा मस्ती करीत आहेत. शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घ्यायला कोणालाच वेळ मिळत नाही. आज महाराष्ट्र मागे चालला असून यासाठी एका व्यक्तीची राक्षसी प्रवृत्ती कारणीभुत आहे. मुख्यमंत्र्याचे कोणावरही नियंत्रण राहिलेले नाही. सरकारविरुद्ध बोलणाऱ्या विरोधात खोट्या केसेस टाकून गुन्हे दाखल करण्याचे काम करीत आहेत. राज्यात लोकशाहीला फार मोठा धोका निर्माण झाला आहे.

Aditya Thackeray Latest Ndews
Sanjay Raut : कोण आला रे..कोण आला..शिवसेनेचा वाघ आला..आर्थर कारागृहाबाहेर शिवसैनिकांची गर्दी

आज मी सांगोला तालुक्यामध्ये अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची व्यथा जाणून घेण्यासाठी आलोय. मला येथील शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घ्यायच्या आहेत. शेतकऱ्यांशी बोलताना एका शेतकऱ्याने आमच्या आमदाराविषयी बोला, असे बोलल्यानंतर मी आज गद्दारांविषयी जास्त बोलणार नाही आज मला शेतकऱ्यांशी बोलू द्या, असा टोला आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी यावेळी लगावला.

दरम्यान, आदित्य पुढे म्हणाले, स्वर्गीय गणपतराव आबांनी तालुक्याचे कमावलेलं नाव आज कुठे नेलं जातय याविषयी प्रश्न उपस्थित होत आहे. एका माणसामुळे या मतदारसंघाचे नाव इकडे तिकडे होत असेल तर येथील जनताच या मतदारसंघाचे नाव पुन्हा एकदा कमावलेल्या स्तरावर नेईल याविषयी मला खात्री आहे, असे म्हणत त्यांनी शहाजीबापूंना डिवचलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com