आदित्य ठाकरेंनी नायगांवला दिले सव्वा दोन कोटी...

मंत्री आदित्य ठाकरे Aditya Thackeray यांनी पर्यटनस्थळांच्या Tourist destination ठिकाणी पायाभुत सुविधा पुरविण्यासाठी प्रादेशिक पर्यटन योजनेतंर्गत हा निधी दिला आहे.
Naigaon, Aditya Thackeray
Naigaon, Aditya Thackeraysarkarnama

शिरवळ : क्रांतीज्योति सावित्रीबाई फुले यांचे जन्मस्थळ म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या नायगांव (ता. खंडाळा ) येथे सांस्कृतिक भवन व दोन मजली प्रतिक्षालयाच्या कामांसाठी शिवसेनेचे तालुकाध्यक्ष आदेश जमदाडे यांनी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांना प्रत्यक्ष भेटून निवेदनाव्दारे निधीची मागणी केली होती. या प्रयत्नाला यश आले असून आदित्य ठाकरे यांनी या कामांसाठी दोन कोटी 11 लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे.

मंत्री आदित्य ठाकरे यांनी पर्यटनस्थळांच्या ठिकाणी पायाभुत सुविधा पुरविण्यासाठी प्रादेशिक पर्यटन योजनेतंर्गत हा निधी दिला आहे. नायगाव येथे भारतीय स्ञी शिक्षणाच्या जनक सावित्रीबाई फुले यांचे स्मारक हे 'ब' वर्ग पर्यटन क्षेत्रात आहे. सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव असल्याने या स्मारकास सामाजिक व ऐतिहासिक महत्व असल्याने लाखो पर्यटक व काही अभ्यासक सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करण्यासाठी येत असतात.

Naigaon, Aditya Thackeray
Video: आदित्य ठाकरेंना उदघाट्न प्रसंगी फोटोग्राफीचा मोह आवरला नाही

यासाठी शिवसेनेचे तालुकाध्यक्ष आदेश जमदाडे यांनी मुंबई येथे मंत्री आदित्य ठाकरे यांची भेट घेऊन याबाबतची मागणी केली होती. यावेळी तत्कालीन सरपंच सुधीर नेवसे, राजेंद्र बबन नेवसे, जग्गनाथ नेवसे व सदस्य उपस्थित होते. त्यांच्या प्रयत्नाला यश मिळाले असून श्री. ठाकरे यांनी निधी मंजूर केला आहे. यासाठी शिवसेना उपनेते नितीन बानगुडे पाटील व सरपंच पुनम नेवसे यांचे सहकार्य मिळाल्याचे जमदाडे यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com