Satara : ॲक्टरांनो आमच्यासारखी ॲक्टींग करून दाखवा... गुलाबराव पाटलांचे चॅलेंज

Gulabrao Patil पाणीपुरवठा योजनांचा ई भूमिपूजन सोहळा आज पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते सातारमध्ये पार पडला. या कार्यक्रमात त्यांनी तुफान फटकेबाजी केली.
Shivsena Minister Gulabrao Patil
Shivsena Minister Gulabrao Patilsarkarnama

Satara News : आम्ही लग्नात गेलो तर हसतो, मयतीला गेलो तर रडल्यासारखं करतो, वाढदिवसाला गेलो तर हॅपी बर्थ डे म्हणतो. हा रोल काही साधा नाहीये. वेगवेगळे विषय घेऊन हजार लोक भेटतात. पण सगळ्यांना भेटून आम्ही बोलतो. एक हजार एक वी व्यक्ती जरी भेटायला आली तरी आम्ही ही पहिलीच व्यक्ती भेटाला आलीय असे त्याच्याशी बोलतो. त्यामुळे चांगल्या चांगल्या ॲक्टरांनी आमच्या सारखी अक्टिंग करून दाखवावी, असे ओपन चॅलेंज पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील Gulabrao Patil यांनी दिले.

सातारा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सरपंचांची जिल्हास्तरीय कार्यशाळा आणि जिल्ह्यातील विविध पाणीपुरवठा योजनांचा ई भूमिपूजन सोहळा आज पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते पार पडला. या कार्यक्रमात बोलताना गुलाबराव पाटील यांनी तुफान फटकेबाजी केली.

मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, माझ्याकडे पाणीपुरवठा खाते असल्याने आज कोणताही आमदार मला भेटल्याशिवाय जाऊ शकत नाही. आम्ही माणसात राहून मानसाळलेली माणसे आहोत. त्यामुळे सकाळी पाच पंचवीस माणसे भेटायला कमी आली की, अस वाटतं की हवा कमी झाली का काय? आमची ओपीडी चालली पाहिजे. आम्ही तर बदनाम जात आहोत. पुढारी म्हणजे बदनाम जात.

Shivsena Minister Gulabrao Patil
Satara : चार पाच डाकूंकडूनच उद्धव ठाकरेंना चुकीचे फिडींग : गुलाबराव पाटील यांची टीका

मी तर सांगतो चांगल्या चांगल्या ॲक्टरांनी आमच्यासारखी ॲक्टिंग करून दाखवावी. आम्ही लग्नात गेलो तर हसतो, मयतीत गेलो तर रडल्यासारखं करतो, वाढदिवसाला गेलो तर हॅपी बर्थ डे म्हणतो. हा रोल काही साधा नाहीये. हजार लोक भेटतात वेगवेगळे विषय घेऊन पण सगळ्यांना भेटून आम्ही बोलतो. एक हजार एक वी व्यक्ती जरी भेटायला आली तरी आम्ही ही पहिलीच व्यक्ती भेटाला आलीय असे त्याच्याशी बोलतो.

Shivsena Minister Gulabrao Patil
Satara : सुरक्षा रक्षकांच्या हक्कासाठी डॉ. येळगांवकर मैदानात; स्वतंत्र कामगार भवन मंजूर

गुलाबराव पाटील यांनी यावेळी एक किस्सा सांगितला. ते म्हणाले, मी १८२ मध्ये पान टपरी चालवत होतो. तेव्हा हे पोलिस लोक मला पकडायला मागे पुढे असायचे. गणपती, दसरा सण आला की पोलिस आलेच. पण, आता बरं वाटतय. आगे गाडी पीछे गाडी बीच मे बैठा गुलाबराव... असे म्हणताच सभागृहात एकच हशा पिकला.

Shivsena Minister Gulabrao Patil
Satara : अण्णासाहेब महामंडळाला भरघोस निधी देण्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही : नरेंद्र पाटील

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com