राष्ट्रवादीला शह देण्यासाठी राम शिंदेंना आमदार करण्याची मागणी

युवा आमदार रोहित पवार ( Rohit Pawar ) यांच्या विरोधात राम शिंदे ( Ram Shinde ) यांना बळ मिळावे यासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी राम शिंदे यांना विधानपरिषदेचे आमदार करण्याची मागणी सुरू केली आहे.
राष्ट्रवादीला शह देण्यासाठी राम शिंदेंना आमदार करण्याची मागणी
Ram ShindeSarkarnama

अहमदनगर - कर्जत-जामखेड विधानसभा मतदार संघात 2019मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपचे माजी मंत्री तथा प्रदेश उपाध्यक्ष राम शिंदे यांचा पराभव झाला होता. विधानपरिषदेतील भाजपच्या चार जागा रिक्त झाल्या आहेत. अहमदनगर जिल्ह्याच्या दक्षिण भागातील राष्ट्रवादीचा वाढता प्रभाव कमी करण्यासाठी तसेच युवा आमदार रोहित पवार ( Rohit Pawar ) यांच्या विरोधात राम शिंदे ( Ram Shinde ) यांना बळ मिळावे यासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी राम शिंदे यांना विधानपरिषदेचे आमदार करण्याची मागणी सुरू केली आहे. ( Activists started lobbying to make Ram Shinde MLA )

अहमदनगर जिल्ह्यातील संघटनात्मक बांधणी व आगामी निवडणुकी संदर्भात भाजप मजबुतीसाठी राम शिंदे यांना विधान परिषदेची संधी मिळावी, अशी गळ अहमदनगर जिल्ह्यातील जिल्हाध्यक्षांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना घातली आहे. आगामी मे व जून महिन्यात होणार्‍या विधान परिषदेच्या निवडणुकीत राम शिंदे यांना उमेदवारी देण्यात यावी, अशी मागणी प्रथम संघटनात्मक पातळीवर करण्यात आली आहे.

Ram Shinde
रोहित पवार-राम शिंदे एकाच मंचावर : ना एकमेकांकडे पाहिले... ना बोलले...

राज्याच्या कोअर कमिटीच्या सदस्यपदी निवड झाल्यानंतर जिल्ह्याच्यावतीने सत्कार समारंभ अहमदनगरमधील पेमराज सारडा महाविद्यालयात आयोजित केला होता, यावेळी माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांनी राम शिंदे यांना विधान परिषदेची संधी मिळावी, असा ठराव मांडला होता. या ठरावही यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे देण्यात आला होता.

प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना निवेदन देताना भाजप दक्षिण जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, उत्तर जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, जिल्हा परिषदेचे गटनेते जालिंदर वाकचौरे, जिल्हा संघटन सरचिटणीस दिलीप भालसिंग, सचिन पोटरे, नितीन दिनकर, सुनील पवार, अशोक पवार, गणेश पालवे, पप्पू गोधड आदींसह जिल्ह्यातील भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.

Ram Shinde
रोहित पवार म्हणाले, भाजपने महाराष्ट्राच्या संस्कृतीला लक्ष्य केलय...

प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी जिल्ह्यातील संघटनात्मक आढावा घेत आगामी निवडणुकी संदर्भात विस्तृत चर्चा केली. विधानसभा निहाय माहिती घेत जिल्ह्यासाठी स्वतंत्र वेळ देणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची नुकतीच अहमदनगर जिल्ह्याच्या प्रभारीपदी निवड झाल्यामुळे जिल्ह्यातील आगामी सर्वच निवडणुकांना महत्वप्राप्त झाले. राज्य पातळीवरील नेतृत्वाला अहमदनगर जिल्ह्यात संधी मिळाल्याने निवडणुकांमध्ये चुरस निर्माण होणार आहे. जिल्ह्यात येऊन दोन विधानसभा निहाय संयुक्त बैठका घेऊन स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांबाबत तीन जिल्हाध्यक्षांना माहिती संकलित करुन, अहवाल तयार करावे, असेही यावेळी सूचविण्यात आले.

भाजपचे दक्षिण जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे यांनी माजी मंत्री राम शिंदे तालुकाध्यक्ष पदापासून प्रदेश उपाध्यक्ष पदापर्यंत पक्षातील संघटनात्मक कामांमुळे पोहचले आहेत. अहमदनगर जिल्ह्यात 12 ही विधानसभा मतदार संघात पालकमंत्री असतांना सर्वांना न्याय देण्याची भुमिका घेतली होती. जिल्ह्यात भाजपला गतवैभव मिळवून द्यावयाचे असेल तर राम शिंदे यांना आगामी विधान परिषदेच्या निवडणुकीत संधी देण्यात यावी. भारतीय जनता पक्षाच्या सरकारमध्ये नव्याने निर्माण झालेल्या ओबीसी खात्याचे मंत्री असतांना राज्यातील ओबीसी व भटक्या समाजाला त्यांनी न्याय मिळावून दिला. राज्य पातळीवर प्रतिष्ठेची समजली जाणारी कोअर कमिटी सदस्यपदी निवड झाल्यामुळे राम शिंदे यांचा संघटनेने सन्मानच केला आहे. आता विधान परिषदेच्या निवडणुकीत जिल्ह्यात पक्ष बळकटीसाठी त्यांना संधी मिळावी, असे निवेदनात म्हटले आहे.

Ram Shinde
कर्जतचे सत्ताकारण : रोहित पवार-राम शिंदे यांच्यातील स्पर्धेचा इंटर्व्हल संपला...

फडणवीसांची खेळी

भाजपकडून देवेंद्र फडणवीस यांच्यावर अहमदनगर जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली आहे. अहमदनगर दक्षिण हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला ठरत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी देवेंद्र फडणवीसांचे सहकारी असलेल्या राम शिंदेना ताकद दिली जात असल्याची चर्चा आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.