Mahabaleshwar : तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांसह माजी नगराध्यक्षांवर कारवाई होणार..?

जिल्हा प्रशासन अधिकारी District Administration Officer अभिजीत बापटAbhijit Bapat यांनी नगरविकास खात्याचे Nagarvikas Department उपसचिव यांना पाठवलेल्या चौकशी अहवालात Inquiry report फार गंभीर बाबी नमुद केल्या आहेत.
Mahabaleshwar Palika
Mahabaleshwar Palikasarkarnama

मुंबई : महाबळेश्वर नगरपालिकेच्या स्वच्छता अभियानात भ्रष्टाचार केल्याप्रकरणी चौकशीचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले होते. यावरून जिल्हा प्रशासन अधिकारी अभिजीत बापट यांनी जिल्हाधिकाऱ्यांवतीने नगरविकास खात्याला हा चौकशी अहवाल पाठवला आहे. अहवालात गंभीर बाबी नमुद केल्या आहेत. त्यामुळे तत्कालीन मुख्याधिकारी अमिता दगडे-पाटील व माजी नगराध्यक्षा स्वप्नाली शिंदे यांच्यावर कारवाईची टांगती तलवार उभी राहिल्याने महाबळेश्वरमध्ये खळबळ उडाली आहे.

महाबळेश्वर नगरपालिकेच्या भ्रष्टाचाराबाबत सातारा जिल्हा युवासेना उप जिल्हाप्रमुख सचिन वागदरे यांनी केलेल्या तक्रारीत नगराध्यक्षा व तत्कालीन मुख्याधिकारी अमिता दगडे पाटील यांनी स्वच्छता अभियानाच्या करोडो रुपयांच्या टेंडरमध्ये कोणतीही कायदेशीर पद्धतीचा अवलंब न करता तांत्रिक मंजुरी न घेता आपल्या जवळच्या कार्यकर्त्यांना टेंडर दिल्याचा आरोप केला आहे.

Mahabaleshwar Palika
Eknath Shinde: एकनाथ शिंदे गटाचे आमदार चार दिवसातच गटबाजीने अस्वस्थ?

स्वच्छता अभियानात नियमबाह्य कामे करुन मनमानी अवास्तव रकमा लावुन टेंडर काढून कचरा डेपो, रंगरंगोटी, घंटागाडी खरेदी, डस्टबिन खरेदी, बाजार मुल्यापेक्षा जास्त लेन्स कॅमेरा खरेदी, स्वच्छता अभियानात जाहिराताकरीता दिलेल्या टेंडरचा घोटाळा, यतिराज बांधकाम कंपनीच्या बांधकाम ठेक्याबाबत, स्वच्छता जनजागृती करीता वापरलेल्या सामग्रीमध्ये नियमबाह्यता, सोशल मीडियात जनजागृतीमध्ये अवास्तव व भरमसाठ बीलांची केलेली वाढ, बोगस कर्मचारी दाखवुन बील काढुन कोटी रुपयांचा चुना नगरपालिकेला लावला आदी तक्रारी युवासेना जिल्हा उपाध्यक्ष सचिन वागदरे यांनी केल्या होत्या.

Mahabaleshwar Palika
महाबळेश्वर नगराध्यक्षा चौकशी; अहवाल देण्यास जिल्हाधिकाऱ्यांकडून दिरंगाई

दरम्यान जिल्हा प्रशासन अधिकारी अभिजीत बापट यांनी नगरविकास खात्याचे उपसचिव यांना पाठवलेल्या चौकशी अहवालात फार गंभीर बाबी नमुद केल्या आहेत. महाबळेश्वर नगरपालिकेने खरेदी केलेल्या मशिनरी व साहित्य खरेदी नियमबाह्य व आर्थिक देयके देताना नियमबाह्यता अहवालात चौकशी अधिकाऱ्यांनी ठपका ठेवला आहे. मलनिस्सारण केंद्राच्या देखभाल दुरुस्तीच्या निविदेतमध्ये घोळ, प्रदुषण कर व प्रवासी कराचा नियमबाह्य ठेका, यतिराज कन्स्ट्रक्शन रंगरंगोटीसाठी दिलेला ठेका व यतिराज कन्स्ट्रक्शन कंपनीला काढलेली नियमबाह्य बीले अशा विविध मुद्द्यांवर चौकशी अहवालात भ्रष्टाचार केला असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

Mahabaleshwar Palika
राज्यपाल शिंदे-भाजप गटाला सत्तास्थापनेसाठी कसं आमंत्रित करु शकतात? शिवसेना पुन्हा न्यायालयात

एकनाथ शिंदे काय भूमिका घेणार....

माजी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हेच सध्या राज्याचे मुख्यमंत्री म्हणुन कारभार सांभाळत आहेत. माजी नगराध्यक्षा व तत्कालीन मुख्याधिकारी यांच्यावरील भ्रष्टाचाराची पोलखोल नगरविकास खात्याकडे दाखल अहवालात चौकशी अधिकाऱ्याकडुन स्पष्ट झाले आहे. याबाबत नव्याने आलेले शिंदे सरकार काय भूमिका घेणार याबाबत उत्सुकता वाढली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in