आरोपी पलायन प्रकरण भोवले : औंधचे सहायक पोलिस निरिक्षकांसह पाच पोलिस निलंबित...

गृहमंत्री Home Minister दिलीप वळसे पाटील Dilip Walse Patil यांनी सातारा पोलिसांच्या Satara police कारभाराबाबत प्रचंड नाराजी Extremely annoyed व्यक्त केली होती.
आरोपी पलायन प्रकरण भोवले : औंधचे सहायक पोलिस निरिक्षकांसह पाच पोलिस निलंबित...
Assitant Police Inspectorsarkarnama

सातारा : दरोड्याच्या गुन्ह्यात अटकेत असलेले औंध पोलिस ठाण्याच्या लॉकअपमधून पाच आरोपी पळून गेल्याप्रकरणी औंध पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरिक्षक प्रशांत बदे यांच्यासह पाच पोलिसांना पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी आज निलंबित केले आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील सातारा दौऱ्यावर असताना ही घटना घडली होती, त्यामुळे खळबळ उडाली होती.

औंध पोलिस ठाण्याच्या लॉकअपमधून दरोड्याच्या गुन्ह्यात अटक असलेले पाच आरोपींनी पलायन केले होते. त्याच दिवशी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील जिल्ह्यात होते. त्यामुळे सातारा पोलिसांच्या कारभाराबाबत त्यांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर पळालेल्या संशयित आरोपींना पकडण्यासाठी दहा पथकांनी औंधसह आसपासचा परिसर पिंजून काढण्यास सुरवात केली.

Assitant Police Inspector
Video : सत्तेचा दुरूपयोग करणे चुकीचे : उदयनराजे

या पाचपैकी तीन आरोपी पकडण्यात पोलिसांना यश आले. राहुल पदु भोसले (वय२८, रा.वाजुळ पारगाव, मु.पो.बाबुर्डी, ता.जि.नगर) यास औंधनजीक वरुड भागातून ताब्यात घेतले. सचिन सुभाष भोसले (वय २३, रा.माहीजळगाव, ता.कर्जत, जि.नगर) याला औंध येथे असणाऱ्या खोरी या शिवारातून ताब्यात घेतले आहे. आज अजय सुभाष भोसले (वय२२, रा.माहीजळगाव, ता.कर्जत, जि.नगर) याला औंधनजीक खबालवाडी परिसरातून दुपारी साडेचार वाजता ताब्यात घेतले आहे.

Assitant Police Inspector
सातारा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला हे न पटणारे; भाजप पालिका स्वबळावर लढणार 

औंध पोलिस ठाण्यात कार्यरत असणारे पोलिस उपनिरीक्षक गंगाराम केंद्रे यांच्या पथकाला मंगळवारी तिसरा आरोपी पकडण्यात यश आले. अन्य दोन आरोपी लवकरच ताब्यात घेऊ, असा विश्वास औंध पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत बधे यांनी व्यक्त केला होता. हे सर्व प्रकरण गांभीर्याने घेत पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी आज औंध पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरिक्षक प्रशांत बधे यांच्यासह पाच पोलिसांना निलंबित केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.