अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या उदघाटनाला बहुतांश लोकप्रतिनिधींची दांडी

बाळासाहेब थोरात ( Balasaheb Thorat ) यांच्या महसूल मंत्री पदाच्या पहिल्या कारकिर्दीत तर वास्तूचे लोकार्पण थोरात यांच्याच दुसऱ्या महसूल मंत्री पदाच्या कारकिर्दीत झाले.
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या उदघाटनाला बहुतांश लोकप्रतिनिधींची दांडी

Revenue Minister Balasaheb Thorat inaugurated the new building of Ahmednagar District Collector's Office

Sarkarnama

अहमदनगर : अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयाचा लोकार्पण सोहळा आज झाला. या वास्तूचे भूमिपूजन बाळासाहेब थोरात ( Balasaheb Thorat ) यांच्या महसूल मंत्री पदाच्या पहिल्या कारकिर्दीत तर वास्तूचे लोकार्पण थोरात यांच्याच दुसऱ्या महसूल मंत्री पदाच्या कारकिर्दीत झाले. Absence of majority of people's representatives at the inauguration of Ahmednagar District Collector's Office

अहमदनगर-औरंगाबाद रस्त्या लगत सुमारे 55 कोटी रूपये खर्च करून ही वास्तू तयार करण्यात आली आहे. उभारण्यात आलेल्या नुतन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या घाईने केलेल्या उदघाटनाला अहमदनगरमधील बहुतांश लोकप्रतिनिधींनी पाठ फिरविली. कार्यक्रमाचे नियोजन करणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या ढिसाळ नियोजनामुळे कार्यक्रमस्थळी अनेक वर्ग एकच्या अधिकाऱ्यांना दोन तास उभे राहुन कार्यक्रम पहावा लागला.

Revenue Minister Balasaheb Thorat inaugurated the new building of Ahmednagar District Collector's Office

योगायोगाचे दुसरे नाव म्हणजे बाळासाहेब थोरात

अहमदनगर येथे आठ वर्षांच्या अथक परिश्रमानंतर महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या प्रयत्नातून 55 कोटी रूपये खर्च करून अत्यंत देखणे, सुसज्ज जिल्हाधिकारी कार्यालय उभारले आहे. मुळात कार्यालयाचे काम रेंगाळले होते. महायुती सरकारच्या काळातील एका वर्षी तर चक्क एक रुपयाचा निधी या कामासाठी मिळाला होता. या विरोधात तत्कालीन विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आवाज उठविला होता.

महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर घाईने काम उरकून आज (बुधवारी) महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते उदघाटन झाले. कार्यक्रमाला जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख, खासदार सदाशिव लोखंडे, आमदार बबनराव पाचपुते, डॉ. सुधीर तांबे, लहू कानडे, जिल्हा परिषद अध्यक्ष राजश्री घुले, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, पद्मश्री पोपटराव पवार व राहिबाई पोपेरे, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, महापौर रोहिणी शेंडगे, उपस्थित होत्या. पालकंमंत्री हसन मुश्रीफ यांच्या भाषणाची चित्रफीत दाखवली.

Revenue Minister Balasaheb Thorat inaugurated the new building of Ahmednagar District Collector's Office

केंद्रीय मंत्री दानवेंच्या हातावर कमळाची मेहंदी

मात्र कार्यक्रमाला राज्यमंत्री अब्दुल सत्तार, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, शहरातील आमदार संग्राम जगताप, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, आमदार अरूण जगताप, राधाकृष्ण विखे पाटील, आशुतोष काळे, मोनिका राजळे, नीलेश लंके, रोहित पवार, डॉ. किरण लहामटे यांच्यासह आजी -माजी लोकप्रतिनिधींनी कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. मिळालेल्या माहितीनुसार अनेक आजी-माजी लोकप्रतिनिधींना सार्वजनिक बांधकाम विभागाकडून वेळेवर निमंत्रणच गेले नाही. खासदार सुजय विखे पाटील यांनी नूतन जिल्हाधिकारी कार्यालयाला सायंकाळी चार वाजता भेट देऊन पाहणी केली.

Revenue Minister Balasaheb Thorat inaugurated the new building of Ahmednagar District Collector's Office

कर्डिले, पाचपुतेंच्या घरात ऐकू येणार सनईचे सूर

नियोजन ढासळले

नगरच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात कोणतेही नियोजन झाले नसल्याचे दिसून येत होते. पद्मश्री मिळालेल्या राहिबाई पोपेरे व पोपटराव पवार यांचा सत्कार सर्वात शेवटी करण्यात आला. कार्यक्रमामुळे तरी अनेक वर्ग एकच्या महसूल अधिकाऱ्यांना सुमारे दोन तास उभे राहून कार्यक्रम पहावा लागला. पुरेशी आसन व्यवस्था करण्याचे नियोजनही झाले नाही. 500 लोकांच्या भोजनाची व्यवस्था केली होती प्रत्यक्षात 2000 लोक भोजनासाठी आले. त्यामुळे अनेकांना उपाशी पोटी परत जावे लागले.

Revenue Minister Balasaheb Thorat inaugurated the new building of Ahmednagar District Collector's Office

बीजमाता राहिबाई पोपेरे यांचे दोनदा प्राण वाचविणाऱ्या `बाळु`चा असा केला वाढदिवस

बीजमाता राहिबाईंनी नाकारला फेटा

व्यासपीठावर बसलेल्या सर्व मान्यवरांना फेटे बांधण्यात येत होते. यात जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्री घुले व महापौर रोहिणी शेंडगे यांनाही फेटा बांधण्यात आला. मात्र राहिबाई पोपेरे यांना फेटा बांधण्यासाठी लोक गेले असता त्यांना नम्रपणे फेटा नाकारला आणि आपला नववारीचा पदर नीट करत त्यांनी सन्मानाने सत्कार स्वीकारला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.