अजितदादांची राष्ट्रवादीच्या अधिवेशनाला दुसऱ्या दिवशी दांडी; नाराजीची चर्चा

राष्ट्रवादीच्या अधिवेशनात काल दुपारी सुमारे तासभर भाषण केल्यानंतर अजित पवार हे सायंकाळी शिर्डीतून बाहेर पडले आहेत.
Ajit Pawar
Ajit Pawar Sarkarnama

शिर्डी : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (NCP) शिर्डी (Shirdi) येथील अधिवेशनाला दुसऱ्या दिवशी विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) अनुपस्थित होते, त्यामुळे त्यांच्या नाराजीची चर्चा रंगली आहे. अजितदादा आज घरगुती कार्यक्रमासाठी बाहेरगावी गेल्याचे सांगण्यात येत आहे. (Absence of Ajit Pawar from NCP convention on the second day)

शिर्डी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ‘मंथन-वेध भविष्याचा’ असे दोन दिवसांचे अधिवेशन झाले. पहिल्या दिवशी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आक्रमक भाषण करत कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्याचे काम केले होते. दिल्लीत राष्ट्रीय अधिवेशनावेळी अजित पवार हे बाहेर पडले होते. त्यावेळीही पवार हे नाराज असल्याची चर्चा झाली होती.

Ajit Pawar
घसा बसलेला असूनही पवारांनी भाषण करत कार्यकर्त्यांना केले चार्ज!

दरम्यान, पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे काल ऑनलाईन अधिवेशनाला उपस्थित राहिले होते. त्यानंतर आज दुसऱ्या दिवशी ते रुग्णालयातून थेट पक्षाच्या अधिवेशनाच्या व्यासपीठावर दाखल झाले होते. उपचार सुरू असूनही शरद पवार हे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी शिर्डीत आले होते. मात्र, त्याच वेळी अजित पवार हे शिर्डीत बाहेर गेल्याने एकच चर्चा सुरू झाली आहे.

Ajit Pawar
शरद पवार ब्रीच कॅंडीतून थेट शिर्डीत राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर दाखल

राष्ट्रवादीच्या अधिवेशनात काल दुपारी सुमारे तासभर भाषण केल्यानंतर अजित पवार हे सायंकाळी शिर्डीतून बाहेर पडले आहेत, त्यामुळे कालपासूनच शिर्डीत अजितदादांच्या गैरहजेरीची चर्चा रंगली होती. मात्र, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यावर स्पष्टीकरण देताना आपली परवानगी घेऊनच अजित पवार त्यांच्या घरगुती कार्यक्रमासाठी बाहेरगावी गेले आहेत, असे सांगून वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.

Ajit Pawar
आमदार बबनराव शिंदेंनी पंढरपुरात पुन्हा घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट!

एकंदरीतच, दिल्लीनंतर शिर्डीतही अजित पवार हे कार्यक्रमातून निघून गेल्याने त्यांच्या नाराजीबाबत चर्चा रंगली आहे, त्यामुळे अजितदादा नेमके कुणावर नाराज आहेत आणि का आहेत, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com