Pandharpur News| आयकर विभागाच्या छापेमारीनंतर अभिजीत पाटील पहिल्यांदाच बोलले...

Pandharpur News| Abhijit Patil| छापेमारीनंतर आज भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी त्यांची भेट घेतल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
Abhijit Patil
Abhijit PatilSarkarnama

पंढरपूर : "माझ्या घरावर, कार्यालयांमध्ये केलेल्या छापेमारी आयकर विभागाला काहीच गैर आढळलं नाही. पण धाडी टाकायला लावणाऱ्यांचीही घरेही काचेचीच आहेत. मी आता दोन्ही हातांनी दगड मारेन. " अशी प्रतिक्रिया पंढरपूरचे साखर उद्योजक अभिजीत पाटील (Abhijeet Patil) यांनी दिली. अभिजीत पाटील (Abhijit Patil) यांच्या साखर कारखान्यांसह घर आणि कार्यालयांवर प्राप्तीकर विभागाने (Income tax) एकाच वेळी छापेमारी केली. गेल्या चार-पाच दिवसांपासून ही कारवाई सुरु होती. या सर्व घटनाक्रमावर आज अभिजीत पाटील यांनी भाष्य केलं.

चार दिवसाच्या आयकर विभागाच्या छापेमारी आणि चौकशीतून काहीच साध्य झालं नाही. आयकर विभागाला आमच्या सर्व कारखाने आणि इतर व्यवसायात 1 कोटी 12 लाखांची रोख रक्कम सापडली. पण ही सर्व रक्कम रेकॉर्डवर होती. त्यामुळे त्यांनी जप्त केलेली रक्कम आम्हाला परत दिल्याचे अभिजीत पाटील यांनी सांगितलं. महिलांच्या स्त्री धनात असलेले 50 ते 60 तोळे सोनेही आयकर विभागाने चौकशी करुन हिशोब पडताळून परत केले. तसंच, त्यांना व्यवहारात ज्या काही त्रुटी आढळल्या त्याची कागदपत्रे येत्या पंधरा दिवसात देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत.

Abhijit Patil
अभिजीत पाटलांच्या कारखान्यांसह घरावर दुसऱ्या दिवशीही इन्कम टॅक्सची कारवाई

आयकर विभागाने चार दिवसात अभिजीत पाटील, बंधू अमर पाटील, कारखान्याचे संचालक, सभासद आणि कर्मचारी अशा 100 लोकांची चौकशी केल्याचे त्यांनी सांगितले. पण विठ्ठल सहकारी साखर कारखाना सुरु होऊ नये अशी इच्छा असणाऱ्यांनी आपल्यावर या धाडी टाकायला लावल्या, असा आरोपही पाटील यांनी केला. पण ज्यांनी आपल्या घरावर धाडी टाकायला लावल्या त्यांची घरेही काचेची आहेत. त्यांनी एक दगड मारला आता आमचे दोन्ही हात मोकळे असतील, असाही अभिजीत पाटील यांनी दिला आहे.

दरम्यानअभिजीत पाटील आज सकाळी पंढरपूरमध्ये आले. पंढपूरमध्ये येताच ते भाजप नेते प्रवीण दरेकर यांच्यासोबत तिरंगा यात्रेत सहभागी झाले. प्रवीण दरेकर यांच्यासोबत यात्रेत सहभागी झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. विशेष म्हणजे प्रवीण दरेकर मुंबई डीसीसी बँकेचे अध्यक्ष आहेत. त्यातच त्यांच्या या बॅंकेने अभिजित पाटील यांनी त्यांच्या कारखान्यासाठी 70 कोटीचे अल्पमुदतीचे लोन घेतले असल्याने त्यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे. याहुन लक्षणीय बाब म्हणजे आज प्रवीण दरेकर यांनी अभिजीत पाटील यांच्या कार्यालयात येऊन चहापानाचा आस्वाद घेतल्याने आता अभिजीत पाटील भाजपात प्रवेश करणार असल्याच्या चर्चाही पंढरपूरात सुरु झाल्या आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com