Abhijit Patil
Abhijit Patil Sarkarnama

आमदारकीसाठी इच्छूक अभिजित पाटलांनी ‘मला आमदार झाल्यासारखं वाटतंय’ गाण्यावर धरला ठेका!

विठ्ठल कारखान्यातील निवडणुकीनंतर पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघासाठी ते इच्छूक आहेत.

पंढरपूर : पंढरपूर (Pandharpur) येथील विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे (Vitthal sugar Factory) अध्यक्ष अभिजीत पाटील (Abhijit Patil) यांनी एका कार्यक्रमात ‘मला आमदार झाल्यासारखं वाटतंय’ या गाण्यावर ठेका धरला. विठ्ठल कारखान्यातील निवडणुकीनंतर पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघासाठी (Assembly Election) ते इच्छूक आहेत. त्या दृष्टीने विविध पक्षांकडून त्यांना आपल्याकडे ओढण्यासाठी चढाओढ सुरू आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. (Abhijit Patil Latest News)

अभिजीत पाटील हे पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातून विधानसभेसाठी इच्छुक आहेत. विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीतील यशानंतर त्यांनी पंढरपूर विधानसभेसाठी तयारी सुरू केली आहे. त्यातच ‘मला आमदार झाल्यासारखं वाटतंय’ या गाण्यावर केलेला डान्सची चांगलीच चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

Abhijit Patil
‘अशोक पवारांच्या होमपिचवर दादा पाटलांना आमदारांपेक्षा अधिक मते’

पंढरपूर येथे झालेल्या फेसबुक मित्र संमलेनात कार्यक्रमात अभिजित पाटील सहभागी झाले होते. त्या कार्यक्रमात कार्यकर्त्यांच्या आग्रहानंतर पाटील यांनी गाण्यांवर डान्स केला. त्यांचा मला आमदार झाल्यासारखं वाटतंय या गाण्यावरील ठेका आणि आमदारकीसाठी इच्छूक यामुळे त्याची चर्चा पंढरपूर मतदारसंघाबरोबरच सोलापूर जिल्ह्यात होताना दिसत आहे.

Abhijit Patil
पवारसमर्थकांना धक्का : हायकोर्टाने 'तो' ठराव फेटाळला; विरोधक म्हणतात ‘माजी उपमुख्यमंत्र्यांचा कुटील डाव संपवला’

दरम्यान, विठ्ठल कारखान्याच्या निवडणुकीतील विजयानंतर अभिजित पाटील यांच्या कारखान्यावर आणि पतसंस्थेवर प्राप्तीकर विभागाचा ( इन्कम टॅक्स) छापा पडला होता. त्यानंतर भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी तातडीने पंढरपूर धाव घेत अभिजित पाटील यांची भेट घेतली हेाती. तसेच, पाटील हे लवकरच भाजपमधील दिसतील, असे म्हटले हेाते.

Abhijit Patil
‘आम्ही अजितदादांना भेटलो; पण...’ : भाजप नेते दादा पाटील फराटेंचे स्पष्टीकरण

ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा माढ्यात कार्यक्रमात होता. त्या कार्यक्रमाला व्यासपीठावर पहिल्या रांगेत अभिजीत पाटील हजर होते. व्यासपीठावर असताना त्यांनी पवार यांच्याशी चर्चा केली हेाती. त्यानंतर पवारांनी त्यांना यवतपर्यंत आपल्या गाडीतून नेले हेाते. त्यामुळे अभिजीत पाटील हे राष्ट्रवादीचे पंढरपूरचे उमेदवार असणार अशी चर्चा रंगली होती. त्यानंतर त्यांनी आमदार रोहित पवार यांच्यासोबत विठ्ठल कारखान्यावर एकत्र भोजन घेतले हेाते. त्यामुळे पाटील हे पंढरपूरमधून उमेदवार असणार हे पक्कं आहे. मात्र, कोणत्या पक्षाकडून याच्या उत्तरासाठी निवडणुकीपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in