'आप'चा नगर महापालिकेवर डोळा : सर्व जागा लढविण्याची केली घोषणा

आम आदमी पार्टी ( आप ) ने आता अहमदनगर महापालिकेतही निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.
Meeting of 'Aap' in Ahmednagar
Meeting of 'Aap' in AhmednagarSarkarnama

अहमदनगर - पंजाब विधानसभा निवडणुकीतील विजयामुळे आत्मविश्वास वाढलेल्या आम आदमी पार्टी ( आप ) ने आता अहमदनगर महापालिकेतही निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. तीन दिवसांपूर्वी अहमदनगर शहरातील गुलमोहर प्राईड या हॉटेलमध्ये 'आप' कार्यकर्त्यांची बैठक झाली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती 'आप' शहराध्यक्ष राजेंद्र कर्डिले यांनी सरकारनामाशी बोलताना दिली. ( AAP's eye on Municipal Corporation: Announcing to fight for all the seats )

या बैठकीला 'आप'चे नेते तथा गोव्याचे माजी उद्योग मंत्री महादेव नाईक हे उपस्थित होते. त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी अहमदनगर महापालिकेची आगामी निवडणूक लढविण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अधिक सक्रियपणे काम करण्याचा निर्णय घेतला. या बैठकीला राज्य सचिव धनंजय शिंदे, प्रदेश संयोजक रंगा राचुरे, प्रदेश संघटक विजय कुंभार, पक्षाचे कार्याध्यक्ष भरत खाकाळ, शहराध्यक्ष राजेंद्र कर्डिले, सचिव दिलीप घुले, संपतराव मोरे, महेश घावटे, प्रा. रवी सातपुते, प्रा. अशोक डोंगरे, प्रा. मनोहर माने, विक्रम क्षीरसागर, बाळासाहेब खेसे, प्रकाश फराटे, दिनकरराव अंबाडे, गणेश मारवडे, राजकुमार मोरया, सुधीर कुलकर्णी, रोहन गायकवाड आदी उपस्थित होते.

Meeting of 'Aap' in Ahmednagar
Cricketnama : मनसेने केला 'आप'चा झाडून पराभव; बाबू वागस्करांची जोरदार बॅटींग

नगर महापालिकेतील छोटे पक्ष

अहमदनगर महापालिकेत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप व शिवसेना हेच प्रमुख चार पक्ष आहेत. या व्यतिरिक्त असलेल्या छोट्या पक्षांत बहुजन समाज पक्षाकडे चार तर समाजवादी पक्षाकडे एक नगरसेवक आहे. सपाचा नगरसेवकही काँग्रेसच्या गोटात गेला आहे. त्यामुळे बसप हाच एकमेव छोटा पक्ष अस्तित्त्वात आहे. मात्र दीड वर्षांवर येऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीसाठी मनसे, सपा, भाकप, एमआयएम व आपनेही कंबर सरली आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत बहुरंगी लढत पहायला मिळण्याची चिन्हे आहेत.

पंजाबमधील विजयामुळे आपमध्ये येणाऱ्या कार्यकर्त्यांची संख्या वाढली आहे. प्राध्यापक, डॉक्टर, इंजिनिअर यासारखे उच्च शिक्षित लोक आमच्या संपर्कात आहेत. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर त्यांचा जाहीर पक्ष प्रवेश घडविणार आहोत.

- राजेंद्र कर्डिले, शहराध्यक्ष, आम आदमी पार्टी, अहमदनगर.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com