Kolhapur Crime | शेतकऱ्यानंतर चंद्रकांत पाटलांसमोरच तरुणाचा आत्मदहनाचा प्रयत्न

Kolhapur Politcs| Crime news| चंद्रकांत पाटील यांच्यासमोरच घटना घडूनही पाटील संबंधित तरुणाची साधी विचारपुसही न करता निघून गेल्याने कोल्हापूरात सध्या संतापाचे वातावरण आहे.
चंद्रकांत पाटील
चंद्रकांत पाटीलसरकारनामा

कोल्हापूर : राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या दिवशी साताऱ्यातील शेतकरी सुभाष भानूदास देशमुख (वय ४५) यांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला होता. सोमवारी (२९ ऑगस्ट) उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीमुळे व्यतिथ झालेल्या देशमुख यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. या घटनेला चोवीस तास उलटत नाहीत तर आज कोल्हापूरमध्ये (Kolhapur) एका तरुणाने आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची बाब समोर आली आहे.

राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांच्या समोरच एका तरुणाने आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची बातमी समोर आली आहे. पण त्याचवेळी प्रसंगावधान राखत पोलिसांनी या तरुणाला ताब्यात घेतले. पण तरुणाने टोकाचे पाऊल उचलूनही त्याची कसलीही विचारपूस न करताच चंद्रकांत पाटील निघून गेल्याने कोल्हापूरातील वातावरण चांगलेच तापले आहे. या घटनेमुळे राज्य सरकारच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहे.

चंद्रकांत पाटील
Breaking! विधानभवनाबाहेर आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्याचे निधन

चंद्रकांत पाटील कोल्हापूरमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठकीसाठी आले होते. त्यांच्यासमोरच एका तरुणाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच अंगावर रॉकेल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला. परशुराम नामदेव कांबळे असं या तरुणाचं नाव आहे. या घटनेमुळे तिथे असलेल्या पोलीस प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली होती. पण पोलिसांनी तात्काळ झडप घालून त्याला रोखल्याने मोठा अनर्थ टळला. जयसिंगपूर नगरपालिकेत अनुकंपा तत्वावर नोकरीची मागणी करुनही त्याला नोकरी मिळत नसल्याने परशुराम यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

मात्र, मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासमोरच घटना घडूनही पाटील यांनी आत्मदहन करणाऱ्या परशुराम कांबळे या तरुणाची साधी विचारपुसही केली नाही. पोलिसांनी या तरुणाला ताब्यात घेतल्यानंतर चंद्रकांत पाटील मात्र त्याची कोणतीही विचारपूस न करता आपला ताफा घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयातून निघून गेले. आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या परशुराम यांना पोलिसांनी घेतले ताब्यात आहे.

'नोकरीसाठी आम्ही सर्व पत्रव्यवहार केले आहेत. अधिकाऱ्यांनी त्यासाठी आमच्याकडून पैसेही घेतले, पण अजूनही नोकरी मिळाली नाही, माझ्याकडे सर्व कागदपत्र आहे, पण तरीही पालिका कोणताही निर्णय घेत नाही. एकनाथ शिंदे नगरविकास मंत्री असताना त्यांनाही अनेकदा भेटलो. मंत्रालयातही अनेक चक्करा मारल्या. पण आता आमच्याकडे मुंबईला जायलाही पैसे नाही. अशी व्यथाच या तरुणाने मांडली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com