Khashaba Jadhav : देशाला पहिलं ऑलिंपिक पदक देणाऱ्या खाशाबा जाधवांना गुगलकडून अनोखी मानवंदना!

Khashaba Jadhav : भारत सरकाराने त्यांना पद्म पुरस्कार दिलाच नाही.
Khashaba Jadhav :
Khashaba Jadhav : sarkarnama

कऱ्हाड : ऑलिंपिकमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करून भारताला पहिलं ऑलिंपिक पदक मिळवून देणारे सातारा जिल्ह्यातील गोळेश्वरचे सुपुत्र खाशाबा जाधव यांची आज जयंती आहे. खाशाबा जाधव यांच्या या दैदिप्यमान कामगिरीची ऐतिहासिक दखल आता गुगलने घेतली आहे. गुगलने त्यांच्यावर एक डुडल बनवले आहे. याबाबत बोलताना त्यांचे पुत्र रणजीत जाधव यांनी खाशाबा जाधव यांच्या जयंतीदिनी खंत व्यक्त केली आहे."जगभरात वापरल्या जाणाऱ्या गुगलने खाशाबा जाधव यांच्या कार्याची दखल घेतली, मात्र भारत सरकाराने त्यांना पद्म पुरस्कार दिलाच नाही," असे ते म्हणाले. (Khashaba Jadhav News)

खाशाबा जाधव यांचा जन्मस्थान कऱ्हाड तालुक्यातील गोळेश्वर या गावात १५ जानेवारी १९२६ रोजी झाला. त्यांनी कठोर मेहनतीतून शरीर सामर्थ्य कमावले होते. यातून त्यांनी कुस्तीत नाव कमावण्याचा निश्चय केला. १९४८ या वर्षी त्यांनी लंडन उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांमध्ये फ्लायवेट वजनगटातील कुस्ती स्पर्धेत सहावा क्रमांक पटकावला होता. मात्र यानंतर चारच वर्षांनी खाशाबा जाधव यांनी हेलसिंकी या ठिकाणी झालेल्य ऑलिंपिक कुस्ती स्पर्धेत १९५२ साली भारत देशाला कुस्तीतील पहिले ऑलिंपीकपदक मिळवून दिले.

Khashaba Jadhav :
Sanjay Shirsat : उद्धव ठाकरेंना तिळगुळ द्यायला आवडेल..

भारतासाठी मिळविलेल्या पहिल्या ऑलिम्पिक पदकामुळे खाशाबा जाधव यांचे नाव भारतीय इतिहासात सुवर्णाक्षराने कोरले आहे. त्यांच्या या कामगिरीची दखल आज त्यांच्या जन्मदिनी गुगलने घेतली आहे. खाशाबा जाधव यांच्यवर एक डुडल तयार करुन ते गुगलने प्रकाशित केले आहे. त्यांमुळे त्यांच्या कार्याला जगभरातून उजाळा मिळाला आहे.

Khashaba Jadhav :
Uorfi Javed-Chitra Wagh : चित्रा वाघ पत्रकारावर भडकून म्हणाल्या, "उद्या तू अंतर्वस्त्रावर..."

दरम्यान जगभरात वापरल्या जाणाऱ्या गुगलने दखल घेतली मात्र भारत सरकारने त्यांच्या कार्याची दखल घेवुन त्यांना पद्म पुरस्कारही जाहीर केला नाही अशी खंत त्यांचे पुत्र रणजीत जाधव यांनी व्यक्त केली आहे. याबाबत बोलताना ते म्हणाले, "राजर्षी छत्रपती शाहु महाराज यांच्या वंशजांनी खाशाबा जाधवांना राजाश्रय दिला होता. त्याच्याच सहकार्याने त्यांनी दैदिप्यमान कामगिरी केली होती. गुगलसारख्या मोठ्या मंचाने मानवंदना दिली आहे."

मंत्री शंभुराज देसाई घालणार लक्ष :

गोळेश्वर गावचे सुपूत्र ऑलिंपिकवीर खाशाबा जाधव यांनी देशाला पहिले ऑलिंपिक पदक मिळवून दिले. त्यांच्या कार्याची दखल महाराष्ट्रातील सरकार घेईल, असे सांगून मंत्री शंभुराज देसाई म्हणाले, खाशाबा जाधव यांच्या प्रलंबित कामकाजासंदर्भात मी स्वतः त्यात लक्ष घालून ते काम मार्गी लावणार आहे. त्यासंदर्भात मी त्यांच्या नातेवाईकांनाही भेटलो आहे, असे देसाई म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com