नवनीत राणांनी ज्या युवतीसाठी पोलिसांशी हुज्जत घातली; ती साताऱ्यात सापडली...

बनावट कागदपत्रांच्या Duplicate Document आधारे लग्न लावून दिल्याचा आरोपही खासदार राणा MP Navnit Rana यांनी केला होता.
Amravati Crime
Amravati Crimesarkarnama

सातारा : अमरावतीतील एका युवतीचे अपहरण करुन तिच्याशी आंतरधर्मीय विवाह केल्याचे प्रकरण नुकतेच समोर आले आहे. या प्रकरणातील संबंधित पीडित युवतीस काल (बुधवारी) रात्री अकराच्या सुमारास सातारा येथील रेल्वे स्थानकावर रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतले. या युवतीला ताब्यात घेण्यासाठी पोलिसांनी सहा तासांचा पाठलाग केल्याचे समोर आले आहे. संबंधित युवतीस अमरावती पोलिसांच्या ताब्यात दिले जाणार आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, अमरावती जिल्ह्यातील धारणी येथील एका युवतीचे अपहरण करुन तिच्याशी आंतरधर्मीय विवाह केल्याचे प्रकरण समोर आले आहे. विवाहानंतर संबंधित मुलीला डांबून ठेवल्याचा आरोप संबंधित मुलीच्या नातेवाईकांनी केला होता. तसेच पोलिसांनी पीडित मुलीला पोलीस ठाण्यात आणावे, अशी मागणी केली होती.

Amravati Crime
मुख्यमंत्र्यांचे दिल्लीतून जिल्हाधिकाऱ्यांना आदेश; "अमरावती आणि हिंगोलीच्या समस्या सोडवा"

हे प्रकरण लव्ह जिहादचे असल्यामुळे या प्रकरणात स्थानिक खासदार नवनीत राणा तसेच राज्यसभेचे खासदार अनिल बोंडे यांनी उडी घेतल्यामुळे हे प्रकरण अधिकच चिघळले होते. काल दुपारी खासदार नवनीत राणा यांनी पोलीस ठाण्यात जावून पोलिसांशी हुज्जत घातली होती. बनावट कागदपत्रांच्या आधारे लग्न लावून दिल्याचा आरोपही राणा यांनी केला होता.

Amravati Crime
"लव्ह जिहाद" फूट पाडण्याची रणनीती

दरम्यान, हे प्रकरण ताजे असतानाच बुधवारी रात्री अकराच्या सुमारास रात्री उशिरा सातारा येथील रेल्वे स्थानकावर रेल्वे पोलिसांनी पीडित युवतीस ताब्यात घेतले आहे. संबंधित युवतीला ताब्यात घेण्यासाठी पोलिसांनी सहा तासांचा पाठलाग केल्याचे समोर आले आहे. याबाबत रात्री उशिरापर्यंत सातारा शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद झाला नव्हता. संबंधित युवतीस अमरावती पोलिसांच्या ताब्यात दिले जाणार असल्याचे सांगण्यात आले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in