Jaykumar Gore
Jaykumar Goresarkarnama

भाजपचा साधा कार्यकर्ता राष्ट्रवादीच्या पुढाऱ्यापेक्षा मोठा...जयकुमार गोरे

फडणवीस साहेबांच्या Fadanvis कार्यकाळात पूर्णत्वाला गेलेल्या विकासकामांची उद्‌घाटने करण्याव्यतिरिक्त आघाडी Mahavikas aghadi सरकारने अडीच वर्षांत काहीच केले नाही.

वडूज : राज्यातील महाविकास आघाडीचे अपयशी सरकार अपशकुनी आहे. ते सत्तेत आल्यावर कोरोना आला, मराठा, ओबीसी आणि पदोन्नतीतील आरक्षण गेले. अतिवृष्टीने नुकसान झाले. शेतकऱ्यांची वीज तोडली गेली. एसटी कर्मचाऱ्यांचा संप आणि राज्याचे नुकसान करणाऱ्या अनेक घटना घडल्या, अशी टीका करून आगामी काळात तळागाळापर्यंत मजबूत संघटनात्मक बांधणी असलेला भाजप सर्वांत मोठा पक्ष ठरणार आहे. भाजपचा साधा कार्यकर्ताच राष्ट्रवादीच्या पुढाऱ्यापेक्षा मोठा आहे, असे मत भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे यांनी व्यक्त केले.

वडुज (ता. खटाव) येथे भाजपच्या वतीने आयोजत केलेल्या सत्कार प्रसंगी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात आमदार गोरे बोलत होते. यावेळी तालुकाध्यक्ष धनंजय चव्हाण, विकल्प शहा, अनिल माळी, विश्वासराव काळे, नगरसेविका रेश्मा बनसोडे, रेखा माळी, किशोरी पाटील, जयवंत पाटील, सोमनाथ जाधव, बनाजी पाटोळे, प्रदीप शेटे, अमोल गोडसे, ओंकार चव्हाण, काकासाहेब बनसोडे, विक्रम रोमन, डॉ. वैभव माने, प्रशांत गोडसे, नीलेश कर्पे आदी उपस्थित होते.

Jaykumar Gore
जयकुमार गोरेंवर भाजपची मोठी जबाबदारी; साताऱ्यात दिली ताकद

आमदार गोरे म्हणाले, ''गेल्या १४ वर्षांपासून दोन्ही तालुक्यांतील अनेक महाभागांना फलटण, बारामतीपासून जिल्ह्यातील मात्तब्‍बरांची फौज विरोधात असूनही जयकुमार तीन वेळा आमदार कसा झाला, असा प्रश्न पडला आहे. माझ्या मागे सर्वसामान्य स्वाभिमानी जनतेची ताकद असल्यानेच हे शक्य झाले आहे. सर्वांत मोठा पक्ष असलेल्या भाजपने माझ्यावर जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी दिली आहे. सर्वांच्या सहकार्याने पक्षाने दाखविलेला विश्वास सार्थ ठरवणार आहे. फडणवीस साहेबांच्या कार्यकाळात पूर्णत्वाला गेलेल्या विकासकामांची उद्‌घाटने करण्याव्यतिरिक्त आघाडी सरकारने अडीच वर्षांत काहीच केले नाही.’’

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com