वाढदिनीच ठाकरेंना धक्का; जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव यांचा शिंदे गटाला पाठींबा...

जिल्ह्याच्या पूर्वेकडील East Side भागात माजी मुख्यमंत्री ExCM उद्धव ठाकरे Udhav Thackeray गटाची Groups ताकद strength कमी होणार आहे.
Chandrakant Jadhav
Chandrakant Jadhavsarkarnama

सातारा : सातारा जिल्ह्याच्या पूर्व भागाचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव यांनी उद्धव ठाकरे यांना वाढदिवसादिवशीच धक्का दिला आहे. शिवसेनेला जय महाराष्ट्र करत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठिंबा जाहीर केला आहे.

मागील आठवड्यात शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम जाधव यांनी शिंदे गटात प्रवेश केला असल्याने उद्धव ठाकरेंना धक्क्यावर धक्के बसत आहेत. सातारा जिल्ह्यातील अनेक शिवसेना पदाधिकाऱ्यांनी त्यांना पाठिंबा दर्शवला आहे. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना पाठिंबा दिला आहे. यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गटाला हा एक मोठा धक्का मानला जात आहे.

Chandrakant Jadhav
Shiv sena : शरद पवारांनी शिवसेना फोडली का ? उद्धव ठाकरेंनी दिलं उत्तर..

चंद्रकांत जाधव हे अनेक वर्षांपासून शिवसेनेत कार्यरत आहेत. शिवसेनेच्या विद्यार्थी सेनेचे सातारा लोकसभेचे उपजिल्हा प्रमुख म्हणून त्यांनी काम पाहिले. त्यानंतर विद्यार्थी सेनेचे जिल्हा प्रमुख झाले. तसेच शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुखपदही त्यांनी भूषविले आहे. तसेच ते जिल्हा नियोजन समितीचे सदस्य होते.

Chandrakant Jadhav
sanjay shirsat Video : उद्धव ठाकरे सुद्धा शिवसेना प्रमुख होऊ शकत नाही...

सध्या त्यांच्याकडे जिल्ह्याच्या पूर्व भागातील माण, खटाव, फलटण, कोरेगाव या चार तालुक्यांचे जिल्हा प्रमुखपद होते. त्यांनी या भागात पक्ष वाढीसाठी मोठे काम केले आहे. आता त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना पाठिंबा दिल्याने त्यांच्याबरोबर आणखी काही पदाधिकारीही जाण्याची शक्यता आहे.

Chandrakant Jadhav
ठाणे शहरासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मोठा निर्णय

यामुळे जिल्ह्याच्या पूर्वेकडील भागात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गटाची ताकद कमी होणार आहे. मी शिवसेनेतच असून पक्ष सोडलेला नाही, असे सांगत एकनाथ शिंदे हे सातारा जिल्ह्याचे सुपूत्र असल्याने विकासकामे होण्यासाठी मी त्यांना पाठिंबा देत असल्याचे चंद्रकांत जाधव यांनी म्हटलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in