महाविकास आघाडीच्या आंदोलनात शहर राष्ट्रवादी काँग्रेसचा सवतासुभा

महाराष्ट्रात ( Maharashtra ) जरी महाविकास आघाडीचे ( Mahavikas Aghadi ) नेते एकत्र असले तरी अहमदनगर ( Ahmednagar ) शहरात अजूनही महाविकास आघाडीच्या पक्षांतील नेते व कार्यकर्त्यांची मने एक झालेली नाहीत.
महाविकास आघाडीच्या आंदोलनात शहर राष्ट्रवादी काँग्रेसचा सवतासुभा
Mahavikas Aghadi AhmednagarSarkarnama

अहमदनगर : महाराष्ट्रात जरी महाविकास आघाडीचे नेते एकत्र असले तरी अहमदनगर शहरात अजूनही महाविकास आघाडीच्या पक्षांतील नेते व कार्यकर्त्यांची मने एक झालेली नाहीत. याचा प्रत्यय आज महाविकास आघाडीच्या आंदोलनात आला. शहरातील काँग्रेस व शिवसेनेचे शहर प्रमुख ज्या ठिकाणी आंदोलन करत होते तेथे राष्ट्रवादीचे आमदारच काय साधे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्तेही फिरकटले नाहीत. त्यामुळे अहमदनगर महापालिकेत महाविकास आघाडीची सत्ता असली तरी महाविकास आघाडीत अलबेल नाही हे आता स्पष्ट झाले आहे. A separate movement of the city NCP in the Mahavikas Aghadi movement

शेतकरी आंदोलन व काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांना अटक केल्याच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या तीनही घटक पक्षाने आज महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. त्यामुळे आज अहमदनगर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी व अहमदनगर शहरात आंदोलन होत आहे. महाविकास आघाडीने सकाळी 11 वाजता माळीवाडा बसस्थानका जवळील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्या समोर आंदोलनाचे आयोजन केले होते. यात काँग्रेस व शिवसेनेचे शहर व तालुक्यातील नेते सहभागी झाले मात्र शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले नाहीत.

Mahavikas Aghadi Ahmednagar
पब्लिसीटीस्टंटला नव्हे मी शहर विकासाला महत्त्व देतो - आमदार संग्राम जगताप

उत्तरप्रदेशातील लखीमपूर येथे केंद्रातील मंत्र्यांच्या गाडीखाली शेतकर्‍यांना चिरडून टाकण्यात आलेल्या घटनेच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शहरातील वाडियापार्क येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर निदर्शने करण्यात आली. शेतकरी आंदोलनात हुतात्मा झालेल्या शेतकर्‍यांना श्रध्दांजली वाहून आंदोलनाची सुरुवात करण्यात आली. यावेळी भाजप विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

प्रारंभी महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले. आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, स्थायी समितीचे सभापती अविनाश घुले, विरोधी पक्ष नेते संपत बारस्कर, नगरसेवक प्रकाश भागानगरे, अमोल गाडे, बाळासाहेब जगताप, राष्ट्रवादी युवकचे शहर जिल्हाध्यक्ष अभिजीत खोसे, माजी नगरसेवक संजय झिंजे, काँग्रेसचे उबेद शेख, प्रा. अरविंद शिंदे, महिला राष्ट्रवादीच्या शहर जिल्हाध्यक्षा रेश्मा आठरे, राष्ट्रवादी युवतीच्या अंजली आव्हाड, फारुक रंगरेज, विजय गव्हाळे, संभाजी पवार, सामाजिक न्याय विभागाचे सुरेश बनसोडे, अल्पसंख्यांक विभागाचे साहेबान जहागीरदार, अजिंक्य बोरकर आदी सहभागी झाले होते. या आंदोलनाप्रसंगी वाडियापार्क व परिसरातील नागरिकांना स्वयंफुर्तीने दुकाने बंद ठेऊन महाराष्ट्र बंदमध्ये सहभाग नोंदवला.

Mahavikas Aghadi Ahmednagar
किरण काळे यांचा आमदार जगतापांना टोला : म्हणाले, घाबरणे माझ्या रक्तात नाही

या प्रसंगी आमदार संग्राम जगताप म्हणाले की, उत्तरप्रदेशमध्ये लखीमपूर येथे झालेल्या हिंसाचाराच्या घटनेने लोकशाहीचा स्तंभ ढासाळला. भांडवलदारांच्या हितासाठी कृषी प्रधान देशाची ओळख पुसण्याचे काम भाजप सरकार करीत आहे. शांततेत शेतकर्‍यांचा मोर्चा पुढे जात असताना मागून त्यांच्या अंगावर गाड्या घालून शेतकर्‍यांना अमानुषपणे चिरडण्यात आले. या घटनेची निपक्षपातीपणे चौकशी होण्यासाठी उच्चस्तरीय चौकशी समिती नेमून हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याची व दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.

महाराष्ट्र बंदमध्ये अहमदनगर शहरामध्ये काँग्रेस, शिवसेना संयुक्तरीत्या सहभागी झाली. काँग्रेस, शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकारी त्याचबरोबर कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने एकत्र येत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इम्पेरियल चौक येथील पुतळ्यापाशी काही वेळासाठी रास्ता रोको करत निषेध सभा घेतली. नगर तालुका महाविकास आघाडीचे नेते देखील यामध्ये सहभागी झाले होते.

Mahavikas Aghadi Ahmednagar
मुख्यमंत्र्यांनी शब्द पाळला ! शिवसेनेच्या रोहिणी शेंडगे महापौर होणार, उपमहापौरपद राष्ट्रवादीला

सुरवातीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हार घालण्यात आला. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे सर, शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे ,शिवसेनेचे शहर प्रमुख दिलीप सातपुते, महापौर रोहिणी शेंडगे, विक्रम राठोड, माजी महापौर अभिषेक कळमकर, काँग्रेसचे शहर जिल्हा उपाध्यक्ष अनंतराव गारदे, शहर जिल्हा उपाध्यक्ष खलील सय्यद, अनिस चूडीवाला, माजी महापौर भगवान फुलसौंदर, संभाजी कदम, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रताप शेळके, बाळासाहेब हराळ आदींसह काँग्रेस, शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Stories

No stories found.