"शिवाजीराव नाईक कोणत्याही घरात गेले तरी त्यांच्याबद्दल एक खात्री होती..." : जयंत पाटील

Shivajirao Naik | Jayant Patil | Sharad Pawar | : गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शिवाजीराव नाईक यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
Shivajirao Naik - Jayant Patil
Shivajirao Naik - Jayant Patil Sarkarnama

शिराळा : सांगली जिल्ह्यातील शिराळा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आणि राज्याचे माजी मंत्री शिवाजीराव नाईक (Shivajirao Naik) यांची आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घरवापसी झाली आहे. शिराळा येथे भव्य शेतकरी मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar), प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil), सहकारमंत्री बाळासाहेब पाटील (Balasaheb Patil), खासदार श्रीनिवास पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर नाईक यांच्या पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम पार पडला.

यावेळी जुन्या आठवणींना उजाळा देत जयंत पाटील यांनी, शिवाजीराव नाईक आणि त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांचे स्वागत केले. यावेळी बोलताना मंत्री पाटील म्हणाले, १९९५ साली शिवाजीराव नाईक विधानसभेत निवडून आले. तेव्हा सर्वांनी त्यांना पाठिंबा दिला. त्यांचे लोकसेवेचे काम सुरु होते. या दरम्यान आम्ही कधी सोबत होतो, तर कधी विरोधात. मात्र हा विरोध कधीच वैयक्तिक नव्हता. एकमेकांबद्दलचा आदर आम्ही कधीच कमी होवू दिला नव्हता. कारण नाईक साहेब कोणत्याही घरात गेले तरी त्यांना पुन्हा माझ्याच घरात परत येतील, ते या राष्ट्रवादी परिवाराचा एक दिवस नक्कीच एक विश्वासू सदस्य होतील, याची मला खात्री होती.

Shivajirao Naik - Jayant Patil
गुजरात निवडणूक : भगतसिंग, आंबेडकरांनंतर 'आप'ला महात्मा गांधींची आठवण

मागच्या काही काळात मी संपूर्ण महाराष्ट्रात फिरलो. असा एकही जिल्हा नाही, गाव नाही जिथे शरद पवार यांना मानणारा, त्यांचे विचार मानणारा माणूस नाही. प्रश्न भरपूर आहेत, मात्र ते सोडवण्यासाठी चांगला मार्गदर्शक पाहिजे आणि पवार साहेबांच्या रुपाने आमच्याकडे अवघे विद्यापीठ आहे. त्यांनी मला जलसंपदा विभागाची जबाबदारी दिली. जलमय महाराष्ट्र हे आमचे उद्दिष्ट आहे. सांगली जिल्ह्यातील जत, कवठेमहांकाळ, आटपाडी, खानापूर, शिराळा ज्या ज्या भागात पाण्याची कमतरता आहे, ती कमतरता भरून काढण्यासाठी आम्ही काम करत आहोत.

Shivajirao Naik - Jayant Patil
"मला स्पष्ट बोलायला लावलसं तर तुझी अडचण होईल" : अजितदादा-विश्वजीत कदमांमध्ये जुगलबंदी

राजारामबापू, वसंतदादा पाटील, फत्तेसिंह नाईक यांचे स्वप्न पूर्ण करण्याचे प्रयत्न आम्ही करत आहोत. आम्हाला निश्चितच यात यश मिळेल. आज गुढी पाडवा आहे. शिवाजीराव नाईक यांनी पवित्र दिनी पक्षात प्रवेश केला. येत्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करूयात. अधिकाधिक जागा निवडून आणण्याचा प्रयत्न करूयात आणि २०२४ साली विजयाची गुढी उभारूयात. आम्ही येवढे येणार, तेवढे येणार हे बोलत नाही, करुन दाखवतो, असा विश्वास व्यक्त करत त्यांनी भाजपला टोलाही लगावला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com