Udayanraje Bhosale, Amit Shah
Udayanraje Bhosale, Amit Shahsarkarnama

Udayanraje Bhosale Meets Amit Shah: दिल्लीत शिवाजी महाराजांचे राष्ट्रीय स्मारक उभारावे; उदयनराजेंनी घेतली अमित शाहांची भेट

Udayanraje Bhosale आगामी अधिवेशनात राष्ट्रपुरूषांचा अवमान रोखण्यासाठी नवीन कायदा मंजूर करावा, अशी मागणी उदयनराजेंनी केली.

Delhi News: छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) संपूर्ण देशाचे प्रेरणास्थान आहेत. त्यांचे कर्तृत्व अफाट आहे. त्यांची तुलना कोणाशी होऊ शकत नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांचे चरित्र आणि कार्य संपूर्ण जगासमोर नेण्यासाठी तसेच नव्या पिढीला प्रेरणा देण्यासाठी नवी दिल्ली येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय स्मारक’ उभे करावे, अशी मागणी खासदार उदयनराजे भोसले Udayanraje Bhosale यांनी केंद्रिय गृहमंत्री अमित शाह Amit Shah यांच्याकडे दिल्ली येथे केली.

खासदार उदयनराजे भोसले सध्या दिल्लीत असून आज त्यांनी केंद्रिय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी याबाबतची मागणी करत तसेच पत्रही श्री. शाह यांना दिले. या भेटीत अमित शाह यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली. राष्ट्रपुरूषांचा अवमान रोखणारा कायदा आणावा. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचे शासनमान्य अधिकृत चरित्र प्रकाशित करावे, अशी मागणीही त्यांनी श्री. शाह यांच्याकडे केली.

उदयनराजे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांचे कर्तृत्व अफाट आहे. त्यांची तुलना कोणाशी होऊ शकत नाही. ते संपूर्ण देशाचे प्रेरणास्थान आहेत. त्यामुळे त्यांचा कोणी अवमान करत असेल तर त्याच्यावर कडक कारवाई झालीच पाहिजे. त्यासाठी आगामी अधिवेशनात राष्ट्रपुरूषांचा अवमान रोखण्यासाठी नवीन कायदा मंजूर करावा अशीही मागणी केली.

Udayanraje Bhosale, Amit Shah
Satara : नागालॅंडमध्ये ठरलं तसं उद्या इथंही ठरेल; पण, वेट अँड वॉच : उदयनराजे

त्याबाबत कायदेतज्ञ आणि अभ्यासकांशी चर्चा करू असे गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितले. तसेच या मागण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यासाठी लवकर भेटीचे आश्वासन शाह यांनी यावेळी दिले. छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित महत्वाची ऐतिहासिक कागदपत्रे, वस्तू, चित्रे परदेशातील विविध संग्रहालयातून भारतात आणण्यासाठी राष्ट्रीय स्मारक फार गरजेचे आहे.

Udayanraje Bhosale, Amit Shah
Udayanraje Bhosale : खासदार उदयनराजे फुल फॉर्मात : गांधी टोपी घालून जिप्सी राईड; पाहा खास फोटो!

छत्रपती शिवाजी महाराजांच्या सर्वधर्म समभावाच्या धोरणाला काही कुटील प्रवृत्ती सुरूंग लावताना दिसत आहेत. त्यातून वादंग उठत असून महाराजांचा सातत्याने अवमान होत आहे. यापार्श्वभुमीवर शिवाजी महाराजांचा अधिकृत इतिहास जगासमोर येण्याची गरज आहे. त्यासाठी राज्य आणि केंद्र शासनाने व्यापक समिती नेमून खरा इतिहास नव्याने मांडला पाहिजे. हा इतिहास खंड रूपात तसेच विविध भाषांमध्ये प्रकाशित करावा. हे काम गुणवत्तेच्या आधारावर झाले तर इतिहासाची मोडतोड करण्याच्या प्रयत्नांना पायबंद बसेल. तसेच सामाजिक तेढ निर्माण होणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Udayanraje Bhosale, Amit Shah
Udayanraje Birthday: हटके स्टाईल अन् डायलाॅगबाजी; उदयनराजेंचा अनोखा अंदाज

छत्रपती शिवाजी महाराज यांचे कर्तृत्व अफाट आहे. त्यांची तुलना कोणाशी होऊ शकत नाही. ते संपूर्ण देशाचे प्रेरणास्थान आहेत. त्यामुळे त्यांचा कोणी अवमान करत असेल तर त्याच्यावर कडक कारवाई झालीच पाहिजे. त्यासाठी आगामी अधिवेशनात राष्ट्रपुरूषांचा अवमान रोखण्यासाठी नवीन कायदा मंजूर करावा, अशी मागणी उदयनराजेंनी केली. त्याबाबत कायदेतज्ञ आणि अभ्यासकांशी चर्चा करू असे सांगून या मागण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यासाठी लवकर भेटीचे आश्वासन शाह यांनी दिले.

Udayanraje Bhosale, Amit Shah
Satara : गिरीश बापट यांच्या निधनामुळे शिवेंद्रराजेंच्या वाढदिवसाचे सर्व कार्यक्रम रद्द

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com