शहाजी पाटलांसारखा माणूस फक्त विनोद करू शकतो : विनायक राऊत

गोविंदांना देण्यात येणारे आरक्षण आणि ठाण्यातील बॅनरवरूनही त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला.
Shahaji Patil-Vinayak Raut
Shahaji Patil-Vinayak RautSarkarnama

सोलापूर : शहाजीबापू पाटलांसारखा (Shahaji Patil) माणूस राजकारणात फक्त विनोद करू शकतो; पण मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करू शकत नाही, अशी टीका खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी केली. दरम्यान, गोविंदांना देण्यात येणारे आरक्षण आणि ठाण्यातील बॅनरवरूनही त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांच्यावर निशाणा साधला. (A man like Shahaji Patil can only joke : Vinayak Raut)

शिवसेनेचे खासदार विनायक राऊत सोलापूर जिल्हा दौऱ्यावर आहेत. ते आज शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांचा मतदारसंघ असलेल्या सांगोल्यात जाहीर सभा घेणार आहेत. त्यापूर्वी त्यांनी सोलापुरात पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी शहाजी पाटील यांचा नौटंकी म्हणून उल्लेख केला.

Shahaji Patil-Vinayak Raut
'वर्षा बंगल्यावर शपथ घेणारे गुलाबराव पाटील दुसऱ्या दिवशीच गुवाहाटीला पळून गेले!'

छोटे-छोटे विद्यार्थीपण म्हणतायत ‘नॉट ओके’, आणि ‘शिवसेनाच विल बी ओके’ त्यामुळे सांगोल्यातील जाहीर सभेत संपूर्ण परिस्थिती भगवामय दिसेल, असं म्हणतं शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी सांगोल्याचे शिंदे गटाचे आमदार शहाजी पाटलांवर टीकास्त्र सोडले.

Shahaji Patil-Vinayak Raut
वंचित बहुजन आघाडी शिवसेनेत प्रवेश करणार : शिवसेना खासदाराचे मोठे विधान

गोविंदांना आरक्षण देणार कसं? आरक्षणाचे नेमके निकष काय? केंद्र सरकारने ठरवलेल्या खेळाच्या निकषात गोविंदा बसतात का? नेमकं कोणाचं सर्टिफिकेट ग्राह्य धरणार? असे प्रश्न उपस्थित करत विनायक राऊतांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. ते म्हणाले की, सवंग लोकप्रियतेसाठी घोषणा करायच्या. पण, त्या अंमलात आणायच्या नाहीत, अर्थात त्यासाठी अभ्यास लागतो. पण यांचा अभ्यासच नाही, त्यामुळे यांच्याकडून अपेक्षाच नाहीत.

Shahaji Patil-Vinayak Raut
प्रवेशासाठी शिंदे गटाकडून मला फूस लावली होती; दोन दिवसांत सेनेत परतलेल्या तालुका उपप्रमुखांची कबुली

आम्ही कोणाचा दुस्वास केला नाही. नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत, आम्ही त्यांचा मान ठेवतोच. ठाण्यात बॅनरवर तुम्ही बाळासाहेबांपेक्षा मोदी आणि अमित शहांना मोठं दाखवलं आणि बाळासाहेब व आनंद दिघेंना छोट्याशा कोपऱ्यात लपवलं, यातूनच तुमचं खरं रूप दिसून येतं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com