कुस्ती स्पर्धेवरून साताऱ्यात दोन दिग्गज पहिलवानांची घराणी भिडली....

साहेबराब पवार sahebrao Pawar कुटुंबीयांकडून Family घराणेशाही सुरू असल्याने स्पर्धेवर ऑलम्पिकवीर श्रीरंग अप्पा जाधव shrirang Jadhav यांच्या कुटुंबियांकडून आणि जिल्ह्यातील काही नावाजलेल्या पैलवानांनी टाकला बहिष्कार Boycott by wrestlers
Maharashtra Kesari fight
Maharashtra Kesari fightsatara

सातारा : जिल्हा तालीम संघाच्या उभारणीत अनेक नामवंत मल्लांचे योगदान असून ऑलम्पिक वीर कै. पैलवान श्रीरंग जाधव यांचे मोठे योगदान आहे. त्यांच्या नावाच्या स्वागत कमानीला विरोध करणे म्हणजे आमच्या दैवताला विरोध करण्यासारखे आहे. साहेबराव पवार आणि त्यांच्या दोन चिरंजीवांनी सातारा जिल्हा तालीम संघांचा राजकिय आखाडा केला आहे. ही त्यांची मक्तेदारी आम्ही मोडीत काढू. पण, ज्यांनी आयुष्यात कधीही कुस्ती खेळली नाही, त्यांना आम्हाला वस्तादगिरी शिकवू नये, असा आरोप पैलवान श्रीरंग जाधव यांचे चिरंजीव वनराज जाधव यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केला आहे.

साताऱ्यात सुरू असलेल्या 64 व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत मानापमानाचा वाद चव्हाट्यावर आला आहे. जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष साहेबराब पवार कुटुंबियांकडून घराणेशाही सुरू असून एकाधिकारशाही होत असल्याचा आरोप पैलवान श्रीरंग जाधव यांच्या कुटुंबियांनी केला आहे. पवार कुटुंबियांच्या ताब्यात असलेली सातारा जिल्हा तालीम संघ आणि ऑलम्पिकवीर श्रीरंग अप्पा जाधव यांच्या कुटुंबियांत कुस्ती आयोजनावरून वाद निर्माण झाला आहे. जाधव कुटुंबीयांनी या स्पर्धेवर बहिष्कार घातला आहे. या असंतोषाला वनराज जाधव, महाराष्ट्र केसरी विजेते पैलवान धनाजी फडतरे, बलभीम भोसले, श्रीरंग जाधव यांचे कनिष्ठ बंधू साहेबराव जाधव यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून भूमिका मांडली.

Maharashtra Kesari fight
साताऱ्यात आजपासून रंगणार महाराष्ट्र केसरी स्पर्धा

वनराज जाधव म्हणाले, साहेबराव पवार , त्यांचे चिरंजीव दीपक पवार, सुधीर पवार यांनी जिल्हा तालीम संघाचा राजकिय आखाडा केला आहे. या आखाड्यात पैलवान घडवण्याचा मूळ उद्देश बाजूला पडला आहे. यांच्या जवळ केवळ वाळू सम्राट असतात. कल्पनेपलीकडच्या आहेत. तालीम संघाच्या उभारणीत पैलवान श्रीरंग अप्पा जाधव यांचे मोठे योगदान आहे. ही ता घडवण्यात त्यांना लोकनेते बाळासाहेब देसाई, कै. छत्रपती प्रतापसिंह उर्फ दादासाहेब महाराज, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, ततकालिन जिल्हाधिकारी शिवाजीराव देसाई या मान्वरांचे सहकार्य लाभले होते.

Maharashtra Kesari fight
शरद पवार म्हणतात; राज ठाकरे एका व्याख्यानानंतर चार महिने भूमिगत होणारे नेते

साताऱ्यात तालीम संघ नव्हता त्यावेळी तालमीच्या उभारणीसाठी श्रीरंग आप्पा जाधव यांनी अहोरात्र मेहनत घेतली. कोल्हापूर मध्ये खासबाग तालीम परिसररात कुस्ती क्षेत्रात योगदान देणाऱ्या नामवंत मल्लांची स्मृती स्तंभरूपाने जपण्यात आली आहे. या यादीत श्रीरंग आप्पाचे नाव आहे. कोल्हापूरची माती साताऱ्याच्या पैलवानाचा सन्मान करते, मग साताऱ्याच्या मातीतच त्यांच्या नावाच्या कमानील विरोध कशासाठी होत आहे. सध्या तालीम संघाच्या कधीही कुस्ती न खेळलेल्यांनी आम्हाला वस्तादगिरी शिकवू नये, असा सल्ला बलभीम भोसले यांनी दिला आहे.

Maharashtra Kesari fight
सातारा लोडशेडिंगमुक्त होण्यासाठी पहिले पाऊल पडले...

वनराज जाधव म्हणाले, १९९९ पासून जिल्हा तालीम संघाची कार्यकारिणी बरखास्त आहे. या कार्यकारिणीचे कधीही ऑडीट झालेले नाही. श्रीरंग आप्पा जाधव यांच्या मृत्यूनंतर तालमीच्या कागदपत्रांचा पवार कुटुंबियांनी उपयोग करून स्वतःची वर्णी संघाच्या कार्यकारिणीवर लावून घेतली. स्वतः संघाचे सर्वेसर्वा असल्यासरखे वावरत आहत. पवार कुटुंबियांनी एकतरी नामवंत मल्ल घडवल्याचा दाखल द्यावा. तालीम संघाच्या नुतनीकरणापेक्षा आपला फायदा कसा होईल हे पाहिले. या संघात त्यांची एकाधिकारशाही सुर आहे. त्याला आमचा विरोध आहे. तालीम संघ कायदेशीरपणे कसा ताब्यात येईल यासाठी आमचे नियोजन सुरू आहे. त्यांची एकाधिकारशाही आम्ही निश्चितपणे मोडीत काढू. यावेळी श्रीरंग आप्पा जाधव यांची कन्या निवृत्त आयुक्त नीलम जाधव, साहेबराव जाधव, धनाजी फडतरे, बलभीम शिंगरे आदी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com