Shashikant Shinde Vs Mahesh Shinde: साताऱ्यात राजकारण तापलं; जिहे-कटापूर पाणी योजनेवरुन शशिकांत शिंदे- महेश शिंदेंमध्ये जुंपली

Jihe - Katapur Water Scheme: शशिकांत शिंदे यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे
Satara Politics
Satara Politics Sarkarnama

Satara Politics: साताऱ्यात जिहे कटापूर योजनेच्या पाण्यावरून साताऱ्यात राजकारण तापलं आहे. राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे (MLA Shashikant Shinde) आणि शिवसेनेचे (Shivsena) आमदार महेश शिंदे (MLA Mahesh Shinde) यांच्यात पुन्हा वादाची ठिणगी पडली आहे.

सातारा पोलीस प्रशासन आणि जिहे कटापूर योजनेचे अधिकाऱ्यांनी खासगी कामगारांच्या माध्यमातून रात्री पावणेतीन वाजता पोलिसांच्या बंदोबस्तात या योजनेच्या वर्धनगड घाटातील बोगद्यालगत असणाऱ्या रामोशी वाडी तलावात पाणी जाणाऱ्या आउटलेट वॉल बंद करण्याचा प्रयत्न केला.पण तो गावकऱ्यांनी हाणून पाडला.या रामोशीवाडीतील गावकऱ्यांना पाण्यापासून वंचित ठेवण्यासाठी महेश शिंदे पाण्याचा वॉल बंद करण्याचा प्रयत्न करत आहेत. असा आरोप शशिकांत शिंदे यांनी केला आहे. (Maharashtra Politics)

Satara Politics
BJP vs Congress News : भाजपकडून पुन्हा 'हनुमान चालिसा' अस्त्र, दर्शन कॉलनीत वातावरण तापले !

यासोबतच रामोशीवाडीच्या ग्रामस्थांसोबत जिहे कटापुर पाणी योजनेच्या ठिकाणी आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. या घटनेमुळे साताऱ्यात राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे.त्यामुळे एकदा आमदार शशिकांत शिंदे विरुद्ध आमदार महेश शिंदे असा संघर्ष साताऱ्यात जिल्ह्यात उफाळला आहे.

दरम्यान दोन महिन्यांपूर्वीही जिहे कटापूर योजनेवरुन दोघांमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या होत्या. जिहे- कटापूर योजना बंद पाडण्यासाठीच या योजनेचे वर्गीकरण केल्याचा, तसेच सांगलीला पाणी देऊन साताऱ्याचे हक्काचे पाणी बाहेर पळवण्यास हातभार लावल्याच्या आरोप महेश शिंदे यांनी केला होता. त्यावर, जलसंपदामंत्री म्हणून संधी मिळाली, त्या वेळी पाणी वाटपासंदर्भात ‘ते’ म्हणत आहेत, असा कोणताही निर्णय झाला नाही. सुरुवातीला त्यांनी बारामतीला पाणी दिल्याचा आरोप केला. नंतर सांगलीला पाणी दिल्याचे सांगत आहेत. यासंदर्भात काही पुरावे असतील, तर ते त्यांनी द्यावेत, असे आव्हान शशिकांत शिंदे यांनी दिले होते. (Political Breaking News)

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com