Legislative Council Election : नाशिक पदवीधरमध्ये वेगळीच खेळी होणार; शिंदे गट अन् भाजप मोठ्या अपक्षाला देणार पाठिंबा?

Legislative Council Election : नाशिक पदवीधरमध्ये मोठा उलटफेर होणार असल्याची चर्चा
Devendra Fadnavis, Eknath Shinde
Devendra Fadnavis, Eknath ShindeSarkarnama

Legislative Council Election : शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघातील सर्वपक्षांची उमेदवारांची घोषणा झाली. केवळ नाशिक पदवीधर मतदारसंघातल्या भाजपाच्या उमेदवाराबाबत अद्याप कोणतीच निश्‍चिती झाली नाही. नगरमधील एका मोठ्या राजकीय घराण्यातील तरूण नेता अपक्ष अर्ज भरणार असून त्या अपक्ष उमेदवाराला भाजपा-शिंदे गट पाठिंबा देणार असल्याची नवी चर्चा सुरू झाली आहे.

महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांचे लहान बंधू डॉ. राजेंद्र विखे-पाटील यांना भाजपाकडून उमेदवारी मिळणार अशी चर्चा आता मागे पडली आहे. विखे-पाटील यांना उमेदवारी मिळणार नाही हे जवळपास निश्‍चित झाले आहे. मात्र, भाजपा स्वत:चा उमेदवार न देता अपक्ष अर्ज भरणाऱ्या उमेदवाराला पुरस्कृत करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

Devendra Fadnavis, Eknath Shinde
Shivsena News : शिंदेंनी निवडणूक आयोगात टाकलेला डाव ठाकरे उलटवणार : अनिल देसाईंनी स्पष्टच सांगितलं

नगर जिल्ह्यातील मोठ्या राजकीय घराण्यातील युवक नेता अपक्ष म्हणून अर्ज भरणार आहे, भाजपा (BJP) आणि शिंदे गट या उमेदवाराला पाठिंबा देणार असल्याचे सांगण्यात येत आहे. राज्यातील जवळपास सर्व मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा झाली आहे. केवळ नाशिक पदवीधरची उमेदवारी भाजपाकडून जाहीर होणे बाकी असल्याचे याबाबतची उत्सुकता शिगेला पोचली आहे.

Devendra Fadnavis, Eknath Shinde
Legislative Council Elections : ठाकरेंनी केला करेक्ट कार्यक्रम; आघाडीत नवीन ट्वीस्ट : नागपुरची जागा शिवसेनेला

भाजपाला सक्षम उमेदवार मिळत नसल्याचे एका तगड्या उमेदवाराला पाठिंबा देण्याची तयारी पक्षाने चालविली असल्याचे सांगण्यात येत आहे. या संदर्भातील निर्णय आज रात्री उशिरा किंवा उद्या सकाळी जाहीर होऊ शकतो, असेही या सूत्रांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com