सदाशिव लोखंडेच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या 15 शिवसैनिकांवर गुन्हा दाखल

खासदार सदाशिव लोखंडे ( Sadashiv Lokhande ) यांच्या विरोधात कोपरगावमध्ये शिवसैनिकांनी आंदोलन केले.
Shivsena
Shivsena Sarkarnama

अहमदनगर - राज्यातील शिवसेनेत दोन गट पडले आहेत. यात शिवसेनेतील 12 खासदार नुकतेच शिंदे गटात गेले आहेत. त्यात शिर्डी लोकसभा मतदार संघातील खासदार सदाशिव लोखंडे ( Sadashiv Lokhande ) यांचा समवेश आहे. त्यामुळे लोखंडे यांच्या विरोधात कोपरगावमध्ये शिवसैनिकांनी आंदोलन केले. या आंदोलना दरम्यान जमावबंदी आदेशाचे उल्लंघन झाल्याचे कारण देत 15 शिवसैनिकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ( A case has been registered against 15 Shiv Sainiks who protested against Sadashiv Lokhande )

खासदार लोखंडे यांनी काही दिवसांपूर्वी शिंदे गटाच्या विरोधात शिर्डीत आंदोलन केले होते. मात्र हेच लोखंडे आता शिंदे गटात गेले आहेत. त्यामुळे कोपरगावमधील संतापलेल्या शिवसैनिकांनी काल ( शुक्रवारी ) लोखंडे यांच्या विरोधात आंदोलन केले.

Shivsena
खासगी डॉक्‍टरांनी माणुसकी दाखवावी : खासदार सदाशिव लोखंडे

या आंदोलनाच्या वेळी प्रतिमेला चपलांचा हार घालण्यात आला. त्यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहनही करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन झाल्याचे कारण देत 15 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला. पोलीस कर्मचारी सचिन शेवाळे यांच्या फिर्यादी नुसार हा गुन्हा दाखल झाला आहे.

Shivsena
असा झाला सदाशिव लोखंडेंचा चेंबूर ते शिर्डी राजकीय प्रवास

गुन्हा दाखल झालेल्यांत शिवसेनेच उत्तर नगर जिल्हा प्रमुख राजेंद्र झावरे, शहर प्रमुख अरविंद चिंदडियाल, वाहतूक सेनेचे इरफान शेख, प्रफुल शिंगाडे, बाळासाहेब साळुंके, विशाल झावरे, विक्रांत झावरे, मधुकर पवार, अक्षय झावरे, अश्विनी होणे, वर्षा शिंगाडे आदींचा समावेश आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in