Bullock Cart Race : खासदार मंडलिकांची परवानगीशिवाय बैलगाडा शर्यत; पाच जण जखमी

गेल्या काही महिन्यांपासून बैलगाडा शर्यतीचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे.
Bullock cart race
Bullock cart race Sarkarnama

Bullock Cart Race : कोल्हापूरमधील मुरगुडचे खासदार संजय मंडलिक यांच्या मुलाच्या वीरेंद्र मंडलिक यांच्या वाढदिवसानिमित्त बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र या शर्यतीदरम्यान काही अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. आता यावर काही कारवाई होणार का असा सवाल उपस्थित केला जात आहे.

या अपघातात पाचजण किरकोळ जखमी झाले आहेत. एका अपघाता बैलगाडा चालकाला फरफटत नेल्याचे दिसत आहे. तर दुसऱ्या अपघातात थेट प्रेक्षकांच्या गर्दीत बैलगाडी घुसल्याने प्रेक्षकही जखमी झाले आहे. याहून गंभीर बाब म्हणजे या बैलगाडा शर्यतीसाठी जिल्हाधिकाऱ्यांची कोणतीही परवानगी घेण्यात आली नव्हती.

Bullock cart race
Farmers : शेतीपिकाचे नुकसान तर होतेच, पण जिवालाही धोका; शेतकऱ्यांचे मुख्यमंत्र्यांना साकडे!

राज्यात ेल्या काही महिन्यांपासून बैलगाडा शर्यतीचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. २०२१ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रात बैलगाडा शर्यतींना सशर्त परवानगी दिली होती. त्यानंतर पुन्हा या निर्णयाला आव्हान देण्यात आले. तेव्हापासून न्यायालयात हे प्रकरण प्रलंबित आहे. असे असतानाही राज्यात अनेक ठिकाणी आजही छुप्या पद्धतीने बैलगाडा शर्यती भरवल्या जात आहे. त्यातच अशा अपघाताच्या घटनांमुळे आयोजकांर कारवाई होणार का, असेही सवाल विचारले जाऊ लागले आहेत.

केंद्र सरकारच्या आदेशानंतर ११ जुलै २०११ रोजी आदेशानुसार उच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतीवर (bullock cart race) बंदी आणली होती.त्यानंतर 20 एप्रिल 2012 रोजी राज्य सरकारने परिपत्रक काढून राज्यात बैलगाडी शर्यतीवर बंदी घालण्यात आल्याचे जाहीर केले होते. यानंतर सातत्याने बैलगाडाप्रेमींकडून बैलगाडा शर्यत सुरुवात करण्याबाबत आग्रही मागणी करण्यात येत होती.

Bullock cart race
Pune News : कसब्याच्या विजयाने रमेश बागवेंच्या आशा पल्लवीत; कँटोन्मेंटमधील गणित बदलणार...?

तसेच पुंणे जिल्ह्यातील आजी-माजी लोकप्रतिनिधींकडून देखील या बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठविण्याबाबत केंद्र सरकारकडे आग्रही भूमिका मांडण्यात आली होती.अखेर सर्वोच्च न्यायालयाने 16 डिसेंबर 2021 रोजी अटी व शर्थींसह बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठवली.यानंतर राज्यात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात बैलगाडा शर्यतींचे आयोजन केले जात आहे.

नोव्हेंवर २०२२ मध्ये या प्रकरणी सुनावणी झाली होती. यानंतर राज्य सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात ॲड. तुषार मेहता, बैलगाडा संघटनेकडून ॲड. गौरव अग्रवाल यांनी युक्तिवाद केला. गेल्यावेळी सुनावणीत ॲनिमल वेल्फेअर बोर्ड ॲाफ इंडिया ही संस्थेनेसुद्धा बैलगाडी शर्यतीवर सकारात्मक भूमिका घेतली आहे. बैलगाडी शर्यतीला बंदी घालण्याची गरज नाही, असं प्रतिज्ञापत्र ॲनिलम वेल्फेअर बोर्डानं न्यायालयात दाखल केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com