Eknath Shinde News : तापोळा,बामणोलीच्या विकासासाठी ९०० कोटींचा निधी : एकनाथ शिंदे

Mahabaleshwar महाबळेश्वर तापोळा या रस्त्याच्या रुंदीकरण व मजबुतीकरण यासाठी ७५ कोटी रुपयांच्या कामाचे भूमिपूजन मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते झाले.
CM Eknath Shinde
CM Eknath Shindesarkarnama

Satara News : तापोळा Tapola, बामणोली परिसराच्या विकासासाठी सुमारे नऊशे कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. या निधीतून बामणोली Bamnoli दरे पुल, आपटी तापोळा पुल, आहेरी तापोळा पुल यासह विविध रस्ते विकासाची कामे सुरू आहेत. या परिसराचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास करण्यात येत असून पर्यटकांसाठी एक आकर्षणाचे केंद्र निर्माण होईल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Eknath Shinde यांनी व्यक्त केला.

तापोळा (ता. महाबळेश्वर) येथे तापोळा - महाबळेश्वर रस्त्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन झाले. यावेळी पालकमंत्री शंभूराज देसाई, खासदार श्रीनिवास पाटील, श्रीकांत शिंदे, आमदार मकरंद पाटील, जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिल्लारी, पोलीस अधीक्षक समीर शेख, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण, अधीक्षक अभियंता संतोष रोकडे आदी उपस्थित होते.

तापोळा ते महाबळेश्वर रस्ता अरुंद असल्याने वाहनचालकांना अनेक अडचणी येत असल्याचे सांगून मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, या अडचणीमुळे काही पर्यटक तापोळा भागात येणे टाळत होते. पण आता हा रस्ता रुंद आणि मजबूत करण्यात येत आहे. त्यामुळे महाबळेश्वरमध्ये येणारा प्रत्येक पर्यटक तापोळा भागात येईल. या रस्त्याचे भूमिपूजन माझ्या हस्ते होत असल्याचा मला आनंद आहे. लोकांनी ही पर्यटनाच्या दृष्टीने व्यवसाय वाढवावा. तापोळा, बामणोलीचा हा परिसर निसर्ग संपन्न आहे. याचा विकास करणे हा आमचा मुख्य उद्देश असल्याचेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

CM Eknath Shinde
Eknath Shinde News : मुख्यमंत्र्यांनी अचानक गाठलं गाव,नाराजीच्या चर्चांना उधाण; सामंत,केसरकरांनी'सस्पेन्स'वाढवला

तापोळा, बामणोली परिसराच्या विकासासाठी सुमारे नऊशे कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. या निधीतून बामणोली दरे पुल, आपटी तापोळा पुल, आहेरी तापोळा पुल यासह विविध रस्ते विकासाची कामे सुरू असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले. या परिसराचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास करण्यात येत आहे. पर्यटकांसाठी एक आकर्षणाचे केंद्र निर्माण होईल असा या परिसराचा विकास होणार आहे. या दुर्गम भागातील तरुणांना नोकरीसाठी बाहेर जावे लागणार नाही असा या परिसराचा विकास केला जाणार असल्याचेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

CM Eknath Shinde
BJP Leaders Unhappy with Eknath Shinde: भाजप वरिष्ठांची एकनाथ शिंदेंवर नाराजी; तर.. राजीनामा तयार ठेवण्याच्या सुचना?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com