मिरजेतील 9 जणांची आत्महत्या की घातपात? पोलिसांना सापडले महत्वाचे पुरावे

Miraj News : पोलिसांना मयताच्या खिशात चिट्ठी सापडली आहे.
मिरजेतील 9 जणांची आत्महत्या की घातपात? पोलिसांना सापडले महत्वाचे पुरावे
Miraj newsSarkarnama

सांगली : मिरज (Miraj News) तालुक्यातील म्हैसाळ मध्ये विषप्राशन करून एकाच कुटुंबातील 9 जणांची आत्महत्या केल्याची घटना घडल्याने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. याबाबत माहिती मिळताच जिल्ह्याचे अधीक्षक दीक्षित कुमार गेडाम उपविभागीय पोलीस (Police)अधीक्षक अशोक वीरकर, पोलीस निरीक्षक चंद्रकांत बेंदरे हे फौजफाटा घेऊन घटनास्थळी दाखल झाले.

आर्थिक कारणावरून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, पोलिसांना मयताच्या खिशात चिट्ठी सापडल्याने याप्रकरणाची कसून तपास सुरू करण्यात आला आहे. संबधित ठिकाणी संशयास्पद सापडलेल सर्व नमुने फॉरेन्सिक लॅब ला पाठवण्यात आले असून यातून काय ते समोर येईल, अशी माहिती पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी दिली आहे. आता याप्रकरणी तपासानंतर काय समोर येत हे बघण महत्वाच ठरणार आहे. (Miraj Crime Latest Marathi News)

Miraj news
धक्कादायक ! मिरज तालुक्यात एकाच कुटुंबातील ९ जणांनी केली आत्महत्या

या घटनेमुळे म्हैसाळ परिसरात खळबळ उडाली असून हे कुटुंब आर्थिक कारणांमुळे तणावत होते, असे स्थानिकांकडून बोलले जात आहे. त्यामुळेच या कुटुंबाने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनीही व्यक्त केला आहे. मात्र, तपासाअंतीच या प्रकरणाचा पुर्ण छडा लागणार असल्याचे गेडाम यांनी सांगितले आहे.

गेडाम म्हणाले की, शासकीय रुग्णालयात सर्व मृतदेहांचे शवविच्छेदन सुरू असून यातुन या नऊ जणांच्या मृत्यूचे कारण समोर येईल. तसेच, संशयास्पद सापडलेले सर्व नमुने फॉरेन्सिक लॅब मधे तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. याचबरोबर सापडलेल्या चिठ्ठीवरूनही तपास करण्यात येणार आहे. या सर्व तपासानंतरच या घटनेचे सत्य समोर येईल. मात्र, प्रथमदर्शी बघता हे आत्महत्येचे प्रकरण वाटते, असेही गेडाम म्हणाले.

Miraj news
फडणवीसांनी शेवटच्या क्षणी स्ट्रॅटेजी बदलली; लाडांना केले सेफ, खापरे "डेंजर' झोनमध्ये?

दरम्यान, म्हैसाळ येथील डॉ. माणिक यल्लाप्पा वनमोरे यांच्यासह कुटुंबातील आठ जणांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. घटनास्थळी पोलिस व ग्रामस्थांनी गर्दी केली असून या घटनेमुळे संपूर्ण सांगली जिल्ह्यात खळबळ माजली आहे. मृतांमध्ये डॉ. माणिक येलाप्पा वनमोरे, आक्काताई वनमोरे (आई), रेखा मानिक वनोरे (बायको), प्रतिमा वनमोरे (मुलगी), आदित्य वनमोरे (मुलगा) आणि पोपट येलाप्पा वनमोरे (शिक्षक), अर्चना वनमोरे (पत्नी), संगीता वनमोरे (मुलगी), शुभम वनमोरे (मुलगा) यांचा समावेश आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in