धक्कादायक ! मिरज तालुक्यात एकाच कुटुंबातील ९ जणांनी केली आत्महत्या

Miraj news : माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
धक्कादायक ! मिरज तालुक्यात एकाच कुटुंबातील ९ जणांनी केली आत्महत्या
Miraj newsSarkarnama

सांगली : मिरज तालुक्यातील म्हैसाळ मध्ये विषप्राशन करून एकाच कुटुंबातील ९ जणांची आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याबाबत माहिती मिळताच पोलीस (Sangali Police) घटनास्थळी दाखल झाले आहेत. आर्थिक कारणावरून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

Miraj news
Vidhan Parishad : आज कोणी पावसात कितीही भिजले तरी त्याचा परिणाम होणार नाही!

नरवाड रोड अंबिकानगर चौंडजे मळा आणि हॉटेल राजधानी कॉर्नर या दोन ठिकाणी एकाच कुटुंबातील नऊ जणांचे घरात मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. आत्महत्या कलेल्या मयतांमध्ये डॉ माणिक यल्लप्पा वनमोरे, पत्नी रेखा माणिक वनमोरे, आई आक्काताई यल्लप्पा वनमोरे, मुलगी प्रतिमा माणिक वनमोरे, मुलगा आदित्य माणिक वनमोरे, पुतण्या शुभम पोपट वनमोरे राजधानी हॉटेल जवळील दुसऱ्या घरात डॉ माणिक यांचा भाऊ पोपट यल्लप्पा वनमोरे, संगीता पोपट वनमोरे, मुलगी अर्चना पोपट वनमोरे याच्या घरात मृतदेह आढळून आले आहेत.

Miraj news
बावनकुळे धनंजय मुंडेंच्या कानात काय कुजबुजले? भेटीगाठींनी चर्चांना आलं उधाण

दरम्यान, याबाबत पोलिसांना माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस अधीक्षक दीक्षित कुमार गेडाम उपविभागीय पोलीस अधीक्षक अशोक वीरकर, पोलीस निरीक्षक चंद्रकांत बेंदरे हे फौजफाटा घेऊन पोचले आहेत. पुढील तपास पोलीस करत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in