जयंतराव, विश्वजित कदमांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या सांगली बँकेसाठी 85 टक्के मतदान

मतदानानंतर दोन्ही पॅनेलच्या नेत्यांनी विजयाचा दावा केला आहे.
जयंतराव, विश्वजित कदमांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या सांगली बँकेसाठी 85 टक्के मतदान
Sangli District Co-operative BankSarkarnama

सांगली : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) आणि काँग्रेसचे राज्यमंत्री डॉ विश्वजित कदम (Dr. Vishwajit Kadam) यांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसाठी (Sangli District Bank) रविवारी (ता. २१ नोव्हेंबर) चुरशीने मतदान पार पडले. महाविकास आघाडीचे सहकार पॅनेल आणि भारतीय जनता पक्षप्रणित शेतकरी विकास पॅनेलमध्ये सरळ लढत झाली. बॅंकेसाठी आज चुरशीने 85.31 टक्के मतदान झाल्याची नोंद झाली आहे. (85.31% turnout for Sangli District Central Co-operative Bank)

सांगली जिल्हा सहकारी बॅंकेसाठी आज चुरशीने झालेल्या मतदानानंतर दोन्ही पॅनेलच्या नेत्यांनी विजयाचा दावा केला आहे. दरम्यान काही ठिकाणी क्रॉस व्होटिंग झाल्याची चर्चा रंगली आहे, त्यामुळे आता सर्वांच्या नजरा 23 नोव्हेंबरकडे होणाऱ्या मतमोजणीकडे लागलेल्या आहेत.

Sangli District Co-operative Bank
शिवसेनेला नकोय एकहाती सत्तेत काँग्रेस-राष्ट्रवादीचा वाटा!

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पंचवार्षिक  निवडणुकीसाठी काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना प्रणित सहकार विकास पॅनेल रिंगणात आहे. या पॅनेलचे तीन उमेदवार यापूर्वीच बिनविरोध झाले आहेत, त्यामुळे उर्वरित १८ जागांसाठी आज मतदान पार पडले. या निवडणुकीत सहकार पॅनेलला टक्कर देण्यासाठी भारतीय जनता पक्षप्रणित शेतकरी विकास पॅनेल रिंगणात उतरले आहे. सांगली जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत भाजप थेटपणे प्रथमच उतरला आहे.

Sangli District Co-operative Bank
तटकरे भास्कर जाधवांच्या चक्रव्यूहात : आता शब्द पाळायचा की पुन्हा पुत्रप्रेम दाखवायचे?

सांगली बॅंकेसाठी आज प्रत्यक्ष पार पडलेल्या निवडणुकीत 85.31 इतके मतदान पार पडले आहे. मतदानानंतर दोन्ही पॅनेलच्या नेत्यांनी विजयाचा दावा केला आहे. पण, काही ठिकाणी क्रॉस व्होटिंग झाल्याची चर्चा रंगल्यामुळे काही जागांवर धक्कादायक निकाल लागू शकतात, त्यामुळे 23 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in