Satara : साताऱ्यात काँक्रिटच्या रस्त्यांसाठी ७५ कोटी द्या; शिवेंद्रसिंहराजेंचे फडणवीसांना साकडे...

राज्यात भाजपचे BJP government सरकार आल्यामुळे शिवेंद्रसिंहराजे Shivendraraje Bhosale यांनी तत्काळ ही मागणी नूतन उपमुख्यमंत्री Dycm देवेंद्र फडणवीस Devendra Fadanvis यांच्याकडे केली आहे.
Shivendrarje Bhosale, Devendra Fadanvis
Shivendrarje Bhosale, Devendra Fadanvissarkarnama

सातारा : सातारा शहरातील रस्त्यांची समस्या कायमची सोडवण्यासाठी सर्व रस्ते काँक्रीटचे करण्यासाठी ७५ कोटींचा निधी द्यावा, अशी मागणी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी नूतन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. तातडीने निधी उपलब्ध करून देण्याच्या सूचना श्री. फडणवीस यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना केल्या आहेत.

राज्यातील इतर मोठ्या शहरांच्या धर्तीवर सातारा शहरातील रस्ते काँक्रीटचे करावेत, अशी मागणी आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. विधानसभा निवडणुकीच्यावेळी प्रचारादरम्यान फडणवीस यांनी यासाठी निधी देण्याची ग्वाही दिली होती. मात्र निवडणुकीनंतर दुदैवाने भाजपचे सरकार आले नाही.

Shivendrarje Bhosale, Devendra Fadanvis
सातारचा पालकमंत्री कोण : शिवेंद्रसिंहराजे की शंभूराज देसाई

मात्र, आता राज्यात भाजपचे सरकार आल्यामुळे शिवेंद्रसिंहराजे यांनी तत्काळ ही मागणी नूतन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. श्री. फडणवीस यांची भेट घेऊन मागणीचे निवेदन शिवेंद्रसिंहराजे यांनी दिले. सातारा पालिका हद्दीत सध्या भुयारी गटर योजनेचे काम सुरु असून शहरातील रस्त्यांची मोठ्याप्रमाणात खुदाई झाली आहे. त्यातच पावसाळा सुरु झाल्याने रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे.

Shivendrarje Bhosale, Devendra Fadanvis
video : शेतकऱ्यांच्या २४ तास विजेसाठी फडणवीस सक्रिय

सातारा शहरातील रस्ते वाहतुकीस धोकादायक झाले असून पालिका हद्दीतील सर्वच रस्ते दर्जेदार व्हावेत यासाठी या रस्त्यांचे काँक्रीटीकरण करणे आवश्यक आहे. त्यामुळे शहरातील रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्यासाठी शासनाच्या नगर विकास विभागांतर्गत पायाभूत सोयी- सुविधा अनुदानातून ७५ कोटी रुपये निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

Shivendrarje Bhosale, Devendra Fadanvis
उदयनराजे म्हणतात मी संजय राऊतांना ओळखत नाही... राजघराण्याबद्दल बोललं तर याद राखा....

यासंदर्भात श्री. फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून निधी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना पुढील कार्यवाही करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यामुळे रस्त्यांच्या काँक्रिटीकरणासाठी लवकरच निधी उपलब्ध होणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com