Sangamner Voting Center : सत्यजित तांबे यांच्या होमपिचवर ५९ टक्के मतदान; डॉ. मैथिली तांबेंनी साधला शुभांगी पाटलांशी संवाद

मालपाणी शाळेतील केंद्रावर मतदानाची वेळ संपल्यानंतरही मतदारांच्या रांगा लागल्याने उशिरापर्यंत मतदान प्रक्रिया सुरु होती. तोपर्यंत शुभांगी पाटील मतदान केंद्रावरच तळ ठोकून बसल्या होत्या.
Satyajeet Tambe
Satyajeet TambeSarkarnama

संगमनेर : विविध राजकीय घडामोडींमुळे चर्चेचे केंद्र ठरलेल्या नाशिक नाशिक (Nashik) पदवीधर मतदार संघासाठी आज शांततेत मतदान पार पडले. संगमनेर (Sangamner) शहरासह तालुक्यातील २८ केंद्रांवर सकाळी आठ ते दुपारी ४ या निर्धारित वेळेत झालेल्या मतदानात, २९ हजार ११५ पदवीधर मतदारांपैकी १७ हजार ९५ मतदारांनी (५८.७२ टक्के) मतदानाचा अधिकार बजावला. (59 percent polling in Sangamner taluk for Nashik graduate constituency)

या निवडणूकीतील सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांची भूमिका, तीन वेळा विधान परिषदेचे आमदार म्हणून काम केलेले डॉ. सुधीर तांबे (Dr. Sudhir Tambe), व राज्याचे माजी महसूलमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांची मातृभुमी असलेल्या संगमनेरकडे राज्याचे लक्ष्य लागले होते.

सकाळी आठ वाजता डॉ. सुधीर तांबे, दुर्गा तांबे, डॉ. मैथीली तांबे, शरयू देशमुख, डॉ. हर्षल तांबे व त्यांच्या पत्नी आदींनी शहरातील मातोश्री रु. दा. मालपाणी विद्यालयातील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. या शिवाय शहरातील सर डी. एम. पेटिट हायस्कुल, आंबरे पाटील कन्या विद्यालय तसेच तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या धांदरफळ बुद्रुक, आश्वी बुद्रुक, शिबलापूर, समनापूर, घारगाव, डोळासणे व पिंपरणे येथील प्राथमिक शाळा तसेच न्यू इंग्लिश स्कूल तळेगाव दिघे व वीरभद्र विद्यालय, साकुर आदि ठिकाणी मतदान केंद्र होते.

Satyajeet Tambe
Nashik Graduate Election : विखे पाटलांच्या गावातील पोलिंग बूथ तहसीलदारांनी केंद्राबाहेर हलवला

उमेदवार सत्यजित तांबे यांनी दुपारी दोनच्या सुमारास मतदानाचा हक्क बजावला. तर साडेतीनच्या सुमारास प्रमुख प्रतिस्पर्धी समजल्या जाणाऱ्या महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील यांनी शहरातील मतदान केंद्रांना भेटी देऊन पाहणी केली. मालपाणी शाळेतील केंद्रावर मतदानाची वेळ संपल्यानंतरही मतदारांच्या रांगा लागल्याने उशिरापर्यंत मतदान प्रक्रिया सुरु होती. तोपर्यंत शुभांगी पाटील मतदान केंद्रावरच तळ ठोकून बसल्या होत्या. दरम्यान केंद्रावर आलेल्या सत्यजीत तांबे यांच्या पत्नी डॉ. मैथिली यांनी त्यांच्याशी संवाद साधून आपल्यात कोणतेही वैमनस्य नसल्याचे स्पष्ट केले.

Satyajeet Tambe
Narendra Patil On Shinde : सरकारला ७ महिने झाले अन॒ मुख्यमंत्री शिंदेंवर पाहिला हल्लाबोल भाजप उपाध्यक्षानेच केला...

जिल्हा पोलिस अधिक्षक राकेश ओला, अप्पर पोलिस अधिकारी श्रीमती स्वाती भोर आदी वरिष्ठ अधिकारी व शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. शहर विभागाचे क्षेत्रीय अधिकारी म्हणून डॉ. शशिकांत मंगरुळे तर ग्रामीण विभागासाठी तहसीलदार अमोल निकम होते.

Satyajeet Tambe
Sharad Pawar News : पवारांनी घेतली लोकसभा अध्यक्षांची भेट; राष्ट्रवादी खासदारावरील निलंबन मागे घेण्याची केली विनंती

निवडणूक अधिकाऱ्यांनी शुभांगी पाटलांना थांबवले

मतदान सुरु असताना भेट देण्यासाठी आलेल्या महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील यांनी मालपाणी विद्यालयातील मतदान केंद्रावर, हात जोडून मतदारांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करताना, निवडणूक अधिकारी तथा प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांनी त्यांना या ठिकाणी कॅनव्हासिंग अलाऊड नसल्याच्या नियमाची जाणीव करुन दिली.

Mantralaya News : ‘भाचा’ गेला अन्‌ ‘मेहुणा’ आला...सरकारी मेहुण्याचे ‘विपुल कारनामे’ पाहून भाजप नेत्यांचा डोक्याला हात

लग्नाच्या बोहल्यावरुन थेट मतदान केंद्रावर

संगमनेर तालुक्यातील वरुडी पठार येथील रमेश फटांगरे व स्वप्नाली घुगे या नव वधुवरांनी लग्न मंडपातून डोळासणे प्राथमिक शाळेतील मतदान केंद्रावर जात, मतदानाचे कर्तव्य बजावले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in