Ramdas Athawale : 50 खोके, बाकी सगळे ओके, तुम्ही मारा छक्के...

विधानसभेसमोर विरोधाकांनी आज दिलेल्या घोषणांवर केंद्रीय मंत्री रामदास आठवले ( Ramdas Athawale ) यांनी त्यांचे मत व्यक्त केले.
Ramdas Athavale
Ramdas AthavaleSarkarnama

Ramdas Athavale : महाराष्ट्राच्या विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सध्या सुरू आहे. विधानसभेसमोर आज विरोधी पक्षातील आमदारांनी 50 खोके आणि बाकी सगळे ओके अशा घोषणा दिल्या होत्या. यावर केंद्रीय मंत्री तथा आरपीआयचे नेते रामदास आठवले ( Ramdas Athawale ) यांनी त्यांचे मत व्यक्त केले.

रामदास आठवले म्हणाले की, घोषणा दिल्या जात आहेत की, 50 खोके आणि बाकी सगळे ओके. मी म्हणतो मार तुम्ही छक्के. त्यामुळे ते किती जरी छक्के मारत असले तरी खोक्यात काही नाही. आणि ओकेत काही अर्थ नाही. जे शिवसेनेचे आमदार फुटले आहेत. ते शिवसेनेच्या निर्णया कंटाळून फुटले आहेत, असे मत त्यांनी व्यक्त केले.

Ramdas Athavale
Ramdas Athawale यांची मोठी घोषणा : शिर्डीतून लोकसभा निवडणूक लढविणार

ते पुढे म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेला काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या दावणीला बांधल्यामुळे हे सर्व आमदार फुटले आहेत. त्यामुळे अशा आरोपात तथ्य नाही. त्यांनी कितीही आरोप केला तरी त्याला अर्थ नाही. शेवटी आमचेच सरकार राज्यात आले आहे. एकनाथ शिंदेंसह 40 आमदार शिवसेनेतून आणणे हे काही लहान मुलांचा खेळ नव्हता. शिवसेनेने ज्या पद्धतीने भाजपच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम केले. मात्र तसे भाजपने केले नाही. एकनाथ शिंदे यांनी मात्र शिवसेनेला मोठा धक्का दिला असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

Ramdas Athavale
भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंनी प्रदेश कार्यालयात जाताच सांगितलं २०२४ च्या विजयाचं गणित

रामदास आठवले यांचा आरपीआय गट सुरवातीला काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर होता. मात्र 2013नंतर ते शिवशक्ती भीमशक्ती एकत्रिकरणाच्या नावाखाली शिवसेना-भाजप युती बरोबर गेले. मात्र अडीच वर्षांपूर्वी शिवसेना महायुतीपासून वेगळे होत. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटात गेल्यापासून आठवले यांच्याकडून शिवसेनेवर टीका होत आहे.

पंतप्रधान पदासाठी नितीश कुमार, लालू प्रसाद यादव, ममता बॅनर्जी आदी असे कोणाचेही चेहरे आणण्याचा अधिकार विरोधकांना आहे. मात्र पंतप्रधानपद मिळणे सोपे काम नाही. एनडीए समोर कोणाला संधी मिळेल असे वाटत नाही. भाजप मित्रपक्षांना संपविते या आरोपात तथ्य नाही. उलट मित्रपक्षच भाजपला धोका देत आहेत, हे नितीश कुमारांच्या उदाहरणावरून दिसून येते. भाजप कधीही म्हणत नाही की हे सरकार भाजपचे आहे. भाजपचे नेते हे एनडीएचे सरकार असल्याचेच सांगतात, असे त्यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com