माजी अधिकाऱ्याच्या ३९ बेहिशोबी मालमत्ता; लवकरच सोमय्या पहाणी करणार...

माझ्या कार्यकर्त्यांनी म्हसवडमध्ये Mhaswad कोणतीही शासकीय मदत न घेता ६०० रुग्णांवर मोफत free उपचार केले होते. यावेळी आमदार गोरेंनी MLA gore वैद्यकीय अधिकाऱ्यांचे कॉल call रेकॉर्डिंगही Recording ऐकवले.
Jaykumar Gore, Prabhakar Deshmukh
Jaykumar Gore, Prabhakar Deshmukhsarkarnama

म्हसवड : शासकीय सेवेतील उच्च पदावरुन निवृत्त झालेल्या एखाद्या अधिकाऱ्याचा अगदी दोन लाखाप्रमाणे एकूण पगार किती होतो आणि देशमुखांच्या देशविदेशातील कोट्यवधींच्या मालमत्ता याचा पर्दाफाश लवकरच होणार आहे. आत्तापर्यंत ३९ मिळकतींची यादी आली आहे. लवकरच किरीट सोमय्या तीनशे एकर जमिनीची पहाणी करण्यासाठी भेट देणार आहेत. जनतेच्या विश्वासावर मी तीन वेळा आमदार झालोय. माझ्याकडे गमावण्यासारखे काही नाही. मात्र, विनाकारण माझ्याविषयी खोटे बोलणाऱ्यांचे अवघड करेन, असा इशारा भाजपचे जिल्हाध्यक्ष, आमदार जयकुमार गोरे यांनी दिला.

म्हसवड नगरपालिकेसमोर आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी आमदार गोपीचंद पडळकर, भाजपाचे माण तालुकाध्यक्ष शिवाजीराव शिंदे, सांगली जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष शिवाजीराव डोंगरे, डॉ. उज्ज्वलकुमार काळे, विजय सिन्हा, डॉ. वसंत मासाळ, शंकरशेठ विरकर, सुरेश म्हेत्रे, विजय धट, नितीन दोशी, ओबीसी युवा मोर्चा सरचिटणीस करण पोरे, धनाजी माने, आदी उपस्थित होते.

Jaykumar Gore, Prabhakar Deshmukh
राष्ट्रवादीला शिंगावर घेण्यासाठी भाजपने आखली रणनिती: जिल्हाध्यक्षपदी जयकुमार गोरेंची निवड

आमदार गोरे म्हणाले, ''कोरोना काळात आमचे मायणी हॉस्पिटल होते, म्हणून दोन्ही तालुक्यातील रुग्णांवर उपचार झाले. वडूजच्या कोविड सेंटरमध्ये फक्त ६३ रुग्णांवर उपचार झाले असताना जिभेला हाड नसणारे खोटारडे देशमुख १४ हजार रुग्णांवर उपचार केल्याचे सांगत आहेत. माझ्या कार्यकर्त्यांनी म्हसवडमध्ये कोणतीही शासकीय मदत न घेता ६०० रुग्णांवर मोफत उपचार केले होते. यावेळी आमदार गोरेंनी वैद्यकीय अधिकाऱ्यांचे कॉल रेकॉर्डिंगही ऐकवले.

Jaykumar Gore, Prabhakar Deshmukh
प्रभाकर देशमुख यांची राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणावर निवड

चाळीस वर्षे विरोधकांची सत्ता होती तेव्हा माण-खटावमध्ये पाणी आले नाही. पृथ्वीच्या अंतापर्यंत या भागात पाणी येणार नाही, असे म्हणणारे देशमुखांचेच नेते होते. पहिल्यांदा आमदार झाल्यापासून आजपर्यंत अहोरात्र परिश्रम करुन मी या भागात पाणी आणल्यावर आता देशमुख त्यांच्या नेत्यांनी पाणी आणल्याचा ढोल बडवत आहेत. उरमोडीचे पाणी आणूनच मी दुसऱ्या वेळी निवडणूक लढवली.

Jaykumar Gore, Prabhakar Deshmukh
देशमुखांची संपत्ती आता रडारवर...जयकुमार गोरेंचा इशारा

आता जिहेकठापूरचे पाणी आणूनच निवडणूक लढवेन असे म्हणताच हे नतद्रष्ट योजनेलाच विरोध करत आहेत. याच देशमुखांनी त्यांना निवडणूकीत मदत करणाऱ्या प्रभाकर घार्गेंना ३०२ च्या केसमध्ये सात महिने जेलमध्ये बसायला लावले. माझ्यावर बेछूट आरोप करणाऱ्यांच्या दुबईपासूनच्या ३९ बेहिशोबी मालमत्तांचा लवकरच पर्दाफाश होणार आहे. ते हभप नव्हे तर लभप म्हणायच्या लायकीचे आहेत. म्हसवड येथील एमआयडीसीसाठी माणच्या दोन अधिकाऱ्यांनी मदत केली, याचा मला अभिमानच आहे. पण, यांनी सीओ असताना काय केले ते एकदा सांगावे.

Jaykumar Gore, Prabhakar Deshmukh
रणजितसिंह निंबाळकरांचे प्रयत्न; माण, खटावच्या १८१ गावात मिळणार नळाद्वारे पाणी...

अडीच वर्षे यांचे सरकार आहे. या काळात मतदारसंघात एकही काम यांनी केले नाही. आपला संघर्ष विकासासाठी, पाण्यासाठी होवू द्या. उगाच खोटे बोलाल तर अवघड होईल, असा इशाराही त्यांनी दिला. जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी देताना पक्षाने टाकलेला विश्वास सर्वांच्या सहकार्याने सार्थ करणार असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. गोपीचंद पडळकर म्हणाले, गावगाड्यातील जयाभाऊंचे नेतृत्व इथल्या जनतेने जपले आणि वाढवले आहे. त्यांच्यावर भाजपने जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी दिल्याने पक्ष नक्कीच घराघरात पोहचणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com